Weather Update News : देशात हवामानात (Weather) सातत्यानं बदल होत आहे. काही भागात थंडीचा जोर (Cold Weather) वाढला आहे, तर काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. सध्या उत्तर भारतात थंडी वाढल्याचे चित्र दिसत आहे. तर दक्षिण भारतात जोरदार पाऊस पडत असल्याचं चित्र दिसत आहे. तर डोंगराळ राज्यांमध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसासह काही भागात बर्फवृष्टी होत आहे. हवामान विभागानं (Meteorology Department) दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. ते आता नैऋत्य बंगालच्या उपसागरावर आणि ईशान्य श्रीलंकेच्या लगतच्या भागात सरकत आहे. त्यामुळं दक्षिण भारतात 12 ते 13 नोव्हेंबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


पुढील दोन दिवस या भागात पावसाची शक्यता


आज आणि उद्या तामिळनाडू, पदुच्चेरी आणि कराईकलमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मच्छिमारांना 12 नोव्हेंबरला म्हणजे आज आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पदुच्चेरी, श्रीलंकेचे किनारे, मन्नारचे आखात आणि लगतच्या कोमोरिन क्षेत्रामध्ये तसेच नैऋत्य बंगाल आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात जाऊ नये असं आव्हान करण्यात आलं आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज दिल्लीत किमान तापमान 14 अंश तर कमाल तापमान 29 अंश राहिल. त्याचवेळी हलके धुके देखील पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 16 नोव्हेंबरपासून दिल्लीत चांगले धुके पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये किमान तापमान 16 अंश तर कमाल तापमान 28 अंश राहण्याची शक्यता आहे. याशिवाय धुके देकील पडण्याची शक्यता आहे. गाझियाबादमध्ये किमान तापमान 14 अंश आणि कमाल तापमान 26 अंश राहील तसेच धुके असेल. चेन्नईच्या पुलियांथोप परिसरात मुसळधार पावसामुळं रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळं तिथं वाहतुकीवर परिणाम झाला होता. चेन्नईतही पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे. दरम्यान, महाारष्ट्रातही तापमानात चढ उतार होत आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. 


13 आणि 14 नोव्हेंबरला  जम्मू-काश्मीरमध्ये पावसाची शक्यता


सध्या जम्मू-काश्मीरमध्ये देखील हवामानात चढउतार सुरूच आहे. श्रीनगरच्या हवामान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार 13 आणि 14 नोव्हेंबरला जम्मू-काश्मीरच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. राज्यातील बहुतांश भागात दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा पाच ते सात अंशांनी कमी आहे. खोऱ्यात थंडीचा कडाका वाढला आहे. गुलमर्ग, लेह आणि कारगिलमध्ये रात्रीचे किमान तापमान शून्याच्या खाली राहिले. आज हवामान स्वच्छ राहील. लेहमध्ये थंडी पडू लागली आहे. येथे रात्रीचे किमान तापमान उणे 8.6 अंश सेल्सिअसवर गेले आहे. कारगिलमध्येही गारवा वाढला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: