Weather Update : देशाच्या विविध भागात जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. पावसामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान  हवामान विभागानं आजही काही राज्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर गोवा आणि दक्षिण गोव्यात रेड अलर्ट जारी केला आहे.


उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. राजधानी दिल्लीस हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळं तेथील काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच राजस्थान, बिहार, गुजरात या राज्यातही पाऊस पडत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातही कोकण विभागासह मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे.


या भागात मुसळधार पावसाचा इशारा 


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण, गोवा, महाराष्ट्र, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, झारखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा-चंडीगड, दिल्ली, पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेशात मुसळधार पाऊसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यानस, पुढील 24 तासात केरळ, कर्नाटक, गुजरात तसेच ईशान्य भारत, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.


अनेक भागात वाहतुकीवर परिणाम


गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर दिल्लीसह अन्य राज्यांमध्ये सखल भागात पाणी साचले. त्यामुळं नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागलं. तसेच काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी  वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


महाराष्ट्रातही पावसाची हजेरी 


राज्याच्या विविध भागात पाऊस (Rain) पडत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अद्यापही संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) पावसानं हजेरी लावलेली नाही. काही भागातच पाऊस झाला आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची कामं खोळंबली आहेत. सध्या राज्यातील कोकण विभागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्याचबरोबर मुंबईसह उपनगर ठाणे, पालघर या जिल्ह्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यासह मराठवाड्यातही काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान आजही कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह इतर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : राज्यातील काही भागात पावसाची हजेरी, आज कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट