Weather Update : देशात मान्सून (monsoon) पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळं देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. हिमाचल प्रदेशसह (Himachal Pradesh) उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान पूर्व आणि मध्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
या भागात मुसळधार पाववसाची शक्यता
उत्तराखंडसह देशातील डोंगराळ राज्यांमध्ये सध्या मोठा पाऊस पडत आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी भूस्खलनाबरोबरच ढगफुटीसदृश्य पाऊस पडत आहे. पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
याशिवाय बिहारमधील पाटणा, गया, मोतिहारी, सुपौल, भागलपूर, दरभंगा इत्यादी जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील प्रयागराज, लखनौ आणि फैजाबाद जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश या राज्यात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काही भागात पावसाचा शेती पिकांना फटका
देशातील काही राज्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. विशेष उत्तर भारतात पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांच्या उभी पिकं पाण्याखाली गेल्यामुळं मोठं नुकसान झालं आहे. हिमाच प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.
ऑगस्ट महिना गेल्या 100 वर्षातील सर्वात जास्त कोरडा
सध्या देशाच्या काही भागात पाऊस पडत असला तरी अनेक ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. त्यामुळं शेतकरी देखील चिंतेत आहेत. दरम्यान यावर्षीचा ऑगस्ट महिना गेल्या 100 वर्षातील सर्वात जास्त कोरडा महिना असल्याचे वृत्त इकोनॉमिक टाइम्स या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. एल निनोच्या (El Nino) प्रभावामुळं पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. याचा उन्हाळी शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
यापूर्वी 2005 मध्ये ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी पाऊस
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने यावर्षी ऑगस्ट महिन्यात आठ टक्क्यापर्यंत पावसाची तूट अपेक्षित धरली होती. यापूर्वी सर्वात कमी पाऊस 2005 च्या ऑगस्ट महिन्यात झाला होता. 2005 मध्ये ऑगस्ट महिन्यात 191.2 मिमी (7.5 इंच) इतका पाऊस झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या: