Cold Weather : सध्या देशाच्या विविध भागात थंडीची लाट (Cold Weather) पसरली आहे. थंडीचा कडाका वाढल्यामुळं अनेक ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. विशेषत: उत्तर भारतात आणि उत्तर-पश्चिम भारतात थंडीचा जोर अधिक आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांनी शेकोट्या पेटवल्या आहेत. अशा स्थितीत भारतीय हवामान विभागाकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाकडून (India Meteorological Department) दिलासादायक बातमी समोर आली आहे. उत्तर आणि पश्चिम भारतात लवकरच थंडीच्या लाटेची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळं नागरिकांना दिलासा मिळणार आहे.


19 जानेवारीपासून थंडीचा जोर कमी होणार 


थंडीचा जोर वाढला आहे. त्याचा नागरिकांना त्रास होत असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र दिसत आहे. दिवसेंदिवस थंडी वाढतच आहे. त्यामुळं हा थंडीचा जोर कधी कमी होणार याची नागरिक प्रतिक्षा करत आहेत. अशात हवामान विभागानं दिलासा देणार बातमी दिली आहे. येत्या 19 जानेवारीपासून म्हणजे गुरुवारपासून उत्तर भारत आणि पश्चिम भारतात थंडीची लाट कमी होणार असून, नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.


उत्तर भारतात कडाक्याची थंडी


सध्या दिल्लीच्या अनेक भागांमध्ये आणि पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागात थंडीची लाट कायम आहे. लोधी रोड आणि सफदरजंग इथे 1.6 अंश आणि 1.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळं थंडीचा जोर अधिक वाढला आहे. मात्र येत्या 19 जानेवारीपासून नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळणार आहे. 


हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 18 जानेवारीपर्यंत राजस्थान, पंजाब आणि हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीच्या अनेक भागात थंडीची लाट कायम राहणार आहे. 
17 ते 19 जानेवारी दरम्यान उत्तर प्रदेश आणि बिहारच्या विविध भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.  हिमाचल प्रदेश आणि कच्छमध्ये 17 ते 18 जानेवारीला थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
17 आणि 18 जानेवारी रोजी पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशात काही ठिकाणी दव पडण्याची शक्यता आहे.
18 जानेवारी दरम्यान जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शकता आहे.
20 जानेवारीला आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि उत्तर-पश्चिम भारताच्या आसपासच्या मैदानांवर परिणाम करेल, ज्यामुळे थंड लाटेपासून पूर्णपणे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
17 जानेवारीच्या सकाळपर्यंत वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये किमान तापमानात आणखी 2 अंश सेल्सिअसची घसरण होण्याची शक्यता आहे. 
18 जानेवारीपर्यंत हवामानात फारसा बदल होणार नाही, परंतु 19 ते 21 जानेवारी दरम्यान 4 ते 6 अंश सेल्सिअसची वाढ नोंदवली जाईल.
गुजरातमध्ये 18 जानेवारीपर्यंत तापमानात विशेष बदल होणार नाही. त्यानंतर 2 ते 4 अंश सेल्सिअस तापमान वाढण्याची शक्यता आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Weather : राज्यात थंडीचा जोर कायम, वाचा कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?