नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये इम्रान खांनी यांनी काश्मीरसह भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण करणाऱ्या प्रश्नांवर बातचित करण्याची विनंती केली आहे.


इम्रान खांनी यांनी दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. खान यांनी पत्रात म्हटले आहे. की दिल्ली आणि इस्लामाबादमध्ये चर्चा व्हायला हवी. काश्मीरसह दोन्ही देशांना भेडसावणारे अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी आपण चर्चेसाठी पुढे यायला हवे.

इम्रान खांन यांनी म्हटले आहे की, दोन्ही देशांसमोरील आव्हाने, दक्षिण आशियामध्ये शांती प्रस्थापित करणे यासाठी भारत पाकिस्तानमध्ये चर्चा होणे एकमेव उपाय आहे. दोन्ही देशांच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींना फोन करुन शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे.

काश्मीरसह भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधींचे उल्लंघन होत आहे. पाकच्या सीमेवर सातत्याने नापाक कुरापती सुरु आहेत. तर दुसऱ्या बाजूला इम्रान खान मोदींना चर्चेचे आवाहन करत आहेत.

14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद मधील दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर 13 दिवसांनी भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून एअर जैशच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राईक केला. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध अधिकच बिघडले आहेत.