प्रलंबित खटल्यांसाठी आणखी 70 हजार न्यायाधीशांची गरज : सरन्यायाधीश
एबीपी माझा वेब टीम | 09 May 2016 05:18 AM (IST)
नवी दिल्ली : देशातील न्यायाधीशांच्या अपुऱ्या संख्येचा मुद्दा सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. देशातील विविध प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यासाठी आणखी 70 हजार न्यायाधीशांची गरज आहे, असं मत टी. एस. ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे. न्यायाधीशांच्या अपुऱ्या संख्येमुळेच प्रकरणं प्रलंबित राहतात, त्यामुळे न्यायाधीशांची संख्या वाढवण्याची गरज त्यांनी पुन्हा बोलून दाखवली आहे. कटक येथील उच्च न्यायालयाच्या सर्किट पीठाच्या शताब्दी महोत्सवात ठाकूर बोलत होते.