हेडलाईन्स

कोल्हापूरच्या महापौर अश्विनी रामाणे यांचे सदस्यत्व रद्द, जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरल्याने कारवाई

 

संदीप सावंत मारहाण प्रकरण, निलेश राणे यांचा अटकपूर्व जामीन खेड कोर्टने फेटाळला, उर्वरित 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी

 

#पुणे : मंगळवार पेठेतील भिमनगरमध्ये भीषण आग, अनेक झोपड्या जळून खाक, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी

------------------------------

नवी दिल्ली : राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेस नेते गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन राहुल यांची सुरक्षा वाढण्याची मागणी करणार

------------------------------

सातारा : छगन भुजबळांन अटक म्हणजे सत्तेचा गैरवापर, चूक नसेल तर सरकारला किंमत मोजावी लागेल, शरद पवार यांची टीका

------------------------------

पुणे : उत्तमनगरमधील दुचाकी जाळणाऱ्याला अटक, घरगुती वादातून बाईक जाळल्याची पोलिसांची माहिती

------------------------------

1. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांच्या भरारी पथकाची नजर, मुंबई-ठाणे-नवी मुंबईत वाहतूक पोलिसांची 30 पथक गस्त घालणार

------------------------------

2. 'नीट' परीक्षेच्या तिढ्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, राज्याच्या सीईटी परीक्षांना मान्यता देण्याबाबत कोर्ट सकारात्मक, केंद्र सरकारही बाजू मांडणार

------------------------------

3. राज्यातील दुष्काळाच्या झळा शिवस्मारकाच्या भूमीपूजनालाही, 22 मे रोजी होणारं भूमीपूजन आता सप्टेंबर महिन्यात, विनायक मेटेंची माहिती

------------------------------

4. बीफ बंदीसंदर्भातील हायकोर्टाच्या निर्णायावर सरकार सुप्रीम कोर्टात जाणार, तर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघाच्या नेत्यांची बैठक

------------------------------

5. नाशिक, मनमाडसह अकोल्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधातीरपीट, पिकांचंही नुकसान

------------------------------

6. मुंबईत गिरणी कामगरांच्या हक्काच्या घराचा संघर्ष आज संपणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज गिरणी कामगारांच्या घराची लॉटरी निघणार

------------------------------

7. मसुचीवाडीतल्या मुलींची छेड काढणाऱ्या तीन गावगुंडांना अटक, नेतेमंडळींची गावात रीघ, छेडछाडप्रकरणी मुलींची शाळा असलेल्या बोरगावचा निषेधाचा ठराव

------------------------------

8. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं आरक्षण फुल्ल, वेटिंग लिस्ट 500 वर पोहोचल्याने चाकरमान्यांचा भ्रमनिरास

------------------------------

9. अक्षय्य तृतीयेनिमित्त ग्राहक आज सोनं खरेदीचा मुहूर्त साधणार, सरफांच्या संपानंतर खरेदीसाठी झुंबड उडण्याची शक्यता

 

एबीपी माझा वेब टीम