'सैफुल्लाहच्या वडिलांचा आम्हाला अभिमान वाटतो', राजनाथ यांचं संसदेत निवदेन
एबीपी माझा वेब टीम | 09 Mar 2017 01:22 PM (IST)
नवी दिल्ली: लखनऊ चकमक आणि मध्यप्रदेशमधील ट्रेन स्फोटाच्या घटनेवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत निवेदन दिलं. राजनाथ सिंह यांनी संपूर्ण घटनाक्रमाचं आढावा घेताना म्हटलं की, 'लखनऊमध्ये मारला गेलेला दहशतवादी सैफुल्लाहच्या वडिलांनी मान्य केलं आहे की, त्यांचा मुलगा देशद्रोही आहे. अशावेळी आम्हा सगळ्यांना सैफुल्लाहच्या वडिलांचा अभिमान वाटतो.' दहशतवादी सैफुल्लाहच्या वडिलांनी त्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. मुलगा देशद्रोही असल्याचं सांगत त्यांनी हा निर्णय घेतला. सैफुल्लाहला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं होतं, पण त्याने ऐकलं नाही, त्यामुळे तो मारला गेला, अशी माहिती सैफुल्लाहचा भाऊ खालिद याने दिली. ‘सैफुल्लाहने आपली कोणतीच गोष्ट ऐकली नाही. सौदीचा व्हिजा झाला असून तिकडे जात असल्याचं सैफुल्लाहने फोनवरुन सांगितलं होतं. देशद्रोही मुलाचा मृतदेह आपण स्वीकारणार नाही’, असं दहशतवादी सैफुल्लाहचे वडील सरताज यांनी सांगितलं. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊतील ठाकूरगंजमध्ये दहशतवादी सैफुल्ला आणि एटीएसमध्ये तब्बल 11 तास चकमक चालू होती. 11 तासांच्या या चकमकीनंतर दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात एटीएसला यश आलं. संबंधित बातम्या: