मुंबई: क्रेडिट कार्डच्या माध्यमातून Paytm वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर केल्यास आता यूर्जसला दोन टक्के अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे. बँक ट्रांझॅक्शन चार्ज द्यावा लागू नये यासाठी अनेकजण पेटीएमचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर कंपनीनं तात्काळ हा निर्णय घेतला.


नव्या नियमानुसार आता क्रेडिट कार्डमधून पेटीएममध्ये पैसे टाकल्यास दोन टक्के चार्ज द्यावा लागेल. 8 मार्चपासून हा नवा नियम लागूही करण्यात आला आहे.

क्रेडिट कार्डमधून पैसे टाकल्यास 2 टक्के चार्ज लागत असला तरीही नेट बँकिंग आणि डेबिट कार्डमधून पेटीएम वॉलेटमध्ये पैसे टाकण्यास मात्र कोणताच चार्ज नसेल. दरम्यान, क्रेडिट कार्डमधून पैसे टाकल्यास तुम्हाला पूर्ण कॅशबॅक मिळणार आहे.

क्रेडिट कार्डमधून पेटीएमवर एखादी वस्तू खरेदी किंवा बिल पेमेंट केल्यास कोणताही अतिरिक्त चार्ज लागणार नाही.

नोटाबंदीनंतर पेटीएमनं छोट्या दुकानदारांसाठी 0% प्लॅटफॉर्म फी सुरु केलं होतं. कारण की, त्यांनी जास्तीत जास्त पेटीएमचा वापर करावा.

पण अनेक यूजर्स हे पेटीएमच्या माध्यमातून पैसे स्वीकारत होते. पण कोणतंही शुल्क न देता ते आपले पैसे बँकेत जमा करत होते. त्यामुळे पेटीएमनं हा निर्णय घेतला. पेटीएमकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात असं म्हटलं आहे की, 'कंपनीला बँक ट्रांझॅक्शनसाठी मोठी किंमत द्यावी लागते. अनेकजण क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे भरुन ते पुन्हा आपल्या बँक खात्यात टाकतात. त्यामुळे कंपनीला नुकसान सोसावं लागतं. जेव्हा यूजर्स पेटीएमवरुन एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हाच कंपनीला फायदा होतो.

संबंधित बातम्या: