Mamata Banerjee On BJP : खोटी आश्वासने, खोटी व्हिडीओ, प्रपोगंडाच्या आधारे भाजप (BJP) हिरो झाला आहे. त्याला आता झिरो करायची वेळ आली असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee On BJP) यांनी म्हटले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (loksabha Election 2024) जवळपास वर्षभराचा काळ राहिला असताना दुसरीकडे विरोधकांची मोट बांधण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पुढाकार घेतल्याचे चित्र आहे. नितीश कुमार यांनी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकातामध्ये भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी विरोधकांच्या एकजुटीची आवश्यकता असल्याचे म्हटले. 


जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन बिहारमध्ये झाले होते. आता, बिहारमध्ये सर्व विरोधी पक्षांच्या बैठकीचे आयोजन करण्यात यावे असेही ममता बॅनर्जी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना म्हटले. सर्व विरोधी पक्ष एक आहेत, असा संदेश देण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी म्हटले. 


ममता बॅनर्जी यांनी म्हटले की,  व्हिजन आणि मिशन स्पष्ट आहे, आम्ही एकत्र लढणार. विरोधकांची एकजूट कोणत्या मुद्यावर अधिक होईल, हे येणारा काळ सांगणार असल्याचेही त्यांनी म्हटले. विरोधकांच्या एकजुटीवर आम्हाला कोणताही आक्षेप नाही. भाजप सध्या हिरो झाला आहे. आता, त्यांना झिरो करायची वेळ आली आहे. खोटे व्हिडीओ, फेक मेसेजेस, प्रचार-प्रपोगंडाच्या आधारे भाजप हिरो ठरत आहे. त्यांना झिरो करायची वेळ आली आहे. विरोधकांना एकत्र यावं लागेल. आमच्यात कोणताही अहंकाराचा मुद्दा नसून आम्हाला एकत्रपणे काम करायचे आहे, असेही ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. 


नितीश कुमार यांनी काय म्हटले?


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, सत्तेत असलेले फक्त स्वत: बद्दल बोलतात. ही स्वातंत्र्याची लढाई आहे. आपल्याला सतर्क राहावे लागेल. लोक इतिहास बदलत आहे. आता इतिहास बदलतील आणि पुढे काय करतील, याचा नेम नाही असेही नितीश कुमार यांनी म्हटले. आम्ही सगळ्यांसोबत चर्चा करत आहोत, आमच्यात चांगली चर्चा झाली. आवश्यकतेनुसार, आम्ही इतर पक्षांसोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले. 


आगामी लोकसभा 2024 च्या निवडणुकीबद्दल त्यांनी म्हटले की,  विरोधी पक्षांना एकत्र यावे लागले. एकत्रितपणे रणनीति ठरवावी लागणार आहे. देशहितासाठी विरोधकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: