तिसऱ्या टप्प्यातील 69 जागांपैकी ‘सपा’ला गेल्या निवडणुकीत 55, ‘बसपा’ला 6, भाजपला 5 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आला होता.
दरम्यान आपण बहुमताने निवडून येऊ, असा विश्वास बसपा अध्यक्ष मायावतींनी बोलून दाखवला आहे. आपले 300 पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील, असं त्या मतदान केल्यानंतर म्हणाल्या.
तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही भाजपचं सरकार बहुमताने येईल, असा विश्वास बोलून दाखवला. मतदान करण्यासाठी गेले असता ते बोलत होते.
उत्तर प्रदेशमध्ये यापूर्वी दोन टप्प्यांमध्ये मतदान झालं असून एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. तर 11 मार्चला मतमोजणी होणार आहे.