मुंबई : तारखेनुसार साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिवजयंतीनिमित्त राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरच्या माध्यमातून शिवरायांना नमन केलं आहे. विशेष म्हणजे मोदींच्या ट्विटर हँडलवरुन मराठी भाषेत चार ट्वीट करण्यात आले आहेत.

'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांना नमन. त्यांच्यासारखे शूर आणि महान व्यक्तिमत्त्व आपल्या भूमीत जन्मले याचा भारताला अभिमान आहे.' अशा पहिल्या ट्वीटसह मोदींनी शिवाजी महाराजांना अभिवादन करतानाचा फोटो पोस्ट केला आहे.

https://twitter.com/narendramodi/status/833129645469999104

'छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेहमीच प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. ते एक उत्तम प्रशासकीय कौशल्य लाभलेले आदर्श राज्यकर्ते होते.' या शब्दात दुसऱ्या ट्वीटमधून मोदींनी शिवरायांचा गौरव केला आहे.

https://twitter.com/narendramodi/status/833129769696890882

'शिवाजी महाराजांना अभिमान वाटेल असा भारत घडवण्यासाठी आम्ही अविरत प्रयत्नशील आहोत.' असं वचन देतानाच 'नुकतेच अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या भव्य शिवस्मारकचे जल-भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. हा दिवस सदैव स्मरणात राहील.' अशी आठवणही त्यांनी सांगितली.

https://twitter.com/narendramodi/status/833129994016661504

https://twitter.com/narendramodi/status/833130184379420673