LIVE : यवतमाळ : स्वतंत्र विदर्भाचे कट्टर पुरस्कर्ते जांबुवंतराव धोटे यांच्यावर अंत्यसंस्कार
एबीपी माझा वेब टीम | 19 Feb 2017 07:18 AM (IST)
रायगड : मुंबई-गोवा हायवेवरील कशेडी घाटातील डोंगरात वणवा, वणव्यामुळे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु ---------------------------------------- मतदानपूर्वीच्या तयारीचा आढावा घेण्यास आशिष शेलारांकडून सुरुवात, दक्षिण मुंबईतील भाजप कार्यालयांना भेट देणार ---------------------------------------- भिवंडी : आनगव येथील गोपाल गोशाळेजवळील पितांबरी कंपनीला भीषण आग, लाखोंचं नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही ---------------------------------------- रत्नागिरी : दापोली-मरुडच्या समुद्रकिनारी स्टंट करत असताना पर्यटकांच्या गाडीला अपघात, सुदैवाने गाडीतील दोघेही बचावले ---------------------------------------- निवडणूक आयोगाच्या नियमांचा आदर, मात्र ‘सामना’वर बंदीची मागणी म्हणजे एक प्रकारची आणीबाणी, ‘सामना’चं निवडणूक आयोगाला पत्र ---------------------------------------- मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परळ, माहिम भागात शिवसेनेच्या कार्यालयांना भेट देणार, मतदानाच्या तयारीचा आढावा घेणार ---------------------------------------- सोलापूर : अवैधरित्या शस्त्र बाळगणारे दोघे अटकेत, 2 पिस्तुलांसह 8 जिवंत काडतुसे जप्त, दोघांविरुद्ध विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल ---------------------------------------- नागपूर : मनिषनगर परिसरात अज्ञातांकडून 40 वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या, सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना, हत्येचं कारण अस्पष्ट ---------------------------------------- भाजप आमदार प्रशांत परिचारक यांचं जवानांबाबतचं वक्तव्य सडक्या मनोवृत्तीचं लक्षण, अजित पवारांचा हल्लाबोल ---------------------------------------- भाजप आमदार प्रशांत परिचारक यांचं जवानांबाबतचं वक्तव्य सडक्या मनोवृत्तीचं लक्षण, अजित पवार यांचा हल्लाबोल ---------------------------------------- अमरावती : दर्यापुरातील शिवाजी अंतरगाव येथील ग्रामस्थांचा पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार, गावात पक्के रस्ते नसल्याने निर्णय, तर काही तरुण 'नोटा' या पर्यायाचा वापर करणार ---------------------------------------- यवतमाळ : स्वतंत्र विदर्भाचे कट्टर पुरस्कर्ते जांबुवंतराव धोटे यांच्यावर अंत्यसंस्कार, पिंपरी गावात हजारो लोकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप ---------------------------------------- सोलापूर : सुशीलकुमार शिंदेंच्या सभेलाही तुरळक प्रतिसाद, 3 वाजताच्या नियोजित सभेला 4 वाजेपर्यंत गर्दी नाही ---------------------------------------- हिंमत असेलच तर शरद पवारांनी सरकार पाडून दाखवावं, मग आम्ही अन्य पक्षातील आमच्या मित्राची ताकद दाखवून देऊ : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील ---------------------------------------- राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करु : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील ---------------------------------------- हेडलाईन्स 1. राज्यातील 10 महापालिका निवडणुकांच्या प्रचारतोफा आज थंडावणार, 21 फेब्रुवारीला मतदान 2. शिवजयंती निमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन, शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शासकीय पूजन 3. भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांची जीभ घसरली, सीमेवरील जवानाविषयी बेताल विधान 4. पारदर्शक असल्यानं पुण्यातील सभेच्या खुर्च्या दिसत नसतील, मुख्यमंत्र्यांच्या फ्लॉप सभेवर राज ठाकरेंची टीका, शरद पवारांकडूनही चिमटा 5. उत्तर प्रदेशातील तिसऱ्या टप्प्यातील 69 जागांसाठी आज मतदान, शिवपाल यादवांसह अपर्णा यादवांचं भवितव्य होणार कैद