Continues below advertisement


मुंबई : एकीकडे रशियाकडून तेल खरेदी केलं म्हणून भारतावर टॅरिफ लावायचे आणि स्वतः मात्र रशियाकडून उर्जेसाठी युरेनियमची भरमसाठ खरेदी करायची असा डबल गेम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्याचं उघड झालं आहे. खुद्द रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनीच अमेरिकेचा हा डाव जगासमोर आणला. गेल्या वर्षी अमेरिकेने रशियाकडून 800 मिलियन डॉलर्सचे युरेनियम खरेदी केले होते, या वर्षी ती खरेदी 1.2 बिलियन डॉलर्स इतकी असेल असं रशियाने स्पष्ट केलं.


भारत हा रशियाचा प्रमुख तेल आयातक देश आहे. पण भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे यासाठी अमेरिका दबाव निर्माण करत आहे. त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर सर्वाधिक म्हणजे 50 टक्के टॅरिफ लावलं आहे. मात्र, दुसरीकडे अमेरिका स्वतःच रशियाकडून अब्जावधी डॉलर्सच्या किमतीचे युरेनियम खरेदी करत असल्याचं उघडकीस आलं आहे.


Vladimir Putin On US : रशियाचा मोठा खुलासा


रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोची (Sochi) येथे झालेल्या इंटरनॅशनल वल्दाई फोरममध्ये (Valdai Forum) हा खुलासा केला आहे. या फोरममध्ये भारतासह 140 देशांचे सुरक्षा आणि भू-राजकीय (Geopolitical) तज्ज्ञ सहभागी झाले होते. पुतिन यांनी सांगितले की, रशिया हा अमेरिकेचा दुसरा सर्वात मोठा युरेनियम पुरवठादार आहे आणि या वर्षी अमेरिका रशियाकडून तब्बल 1.2 अब्ज डॉलर्सचा युरेनियम खरेदी करणार आहे.


US Russia Uranium Trade : 800 मिलियन डॉलर्सचा युरेनियम आधीच विकला


पुतिन यांनी माहिती दिली की, 2024 मध्येच अमेरिकेने रशियाकडून 800 मिलियन डॉलर्सचा युरेनियम खरेदी केला आहे. अमेरिकेत अणुऊर्जा (Nuclear Energy) प्रकल्प मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याने तिथे युरेनियमची मागणी खूप जास्त आहे. आम्ही जगातील सर्वात मोठे पुरवठादार नाही, पण अमेरिकेच्या बाजारपेठेत 25 टक्के युरेनियम रशियाकडून जातो असं पुतिन यांनी स्पष्ट केलं.


Donal Trump Tariffs : ट्रम्प यांच्यावर दुहेरी भूमिकेचा आरोप


पुतिन यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ‘डबल स्टँडर्ड्स’चा आरोप केला. ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ (Tariff) लावले आहे. यामध्ये 25 टक्के टॅरिफ रशियाकडून कच्चा तेल (Crude Oil) खरेदी करणाऱ्या देशांवर पेनल्टी म्हणून लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे, युक्रेन युद्धामुळे पश्चिमी देशांनी रशियावर निर्बंध (Sanctions) लादले असले तरी स्वतः अमेरिका मात्र रशियाकडून केमिकल्स, युरेनियम आणि खत (Fertilizers) खरेदी करत आहे.


India Russia Trade Relations : भारत-रशिया व्यापार संतुलन साधण्याची गरज


पुतिन यांनी स्पष्ट केले की, ट्रम्प यांनी लावलेच्या टॅरिफमुळे भारताला आर्थिक नुकसान होत आहे. त्याची भरपाई रशियाकडून तेल आयात करून केली जाईल. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करतो, त्यामुळे दोन्ही देशांच्या व्यापारात असंतुलन आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पुतिन यांनी आपल्या सरकारला निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, रशिया भारताकडून फार्मास्युटिकल (Pharmaceutical) आणि कृषी उत्पादने (Agriculture Products) मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकतो.



ही बातमी वाचा :