Viral Video News : "दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं" अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. याचा प्रत्यय एका ठिकाणी आला आहे. एका अनोख्या झोपडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहे. ही झोपडी बाहेरुन पाहिल्यानंतर आत कोणते रहस्य दडलेले असेल याची कोणालाच कल्पना देखील नसेल. बाहेरुन एक मोडकळीस आलेली झोपडी दिसत आहे. यावरुन हे एखाद्या गरीबाचे घर आहे असे वाटते. पण प्रत्यक्षात आत शिरताच आश्चर्यात धक्काच बसल्याशिवाय राहणार नाही. व्हायरल झालेला व्हिडीओ हा राजस्थानमधील जैसलमेर येथील असल्याचं बोललं जात आहे. 


आजकाल गावोगावी चोरीच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. श्रीमंत असलेल्या आणि चांगली घरे असलेल्या गावकऱ्यांना चोरांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत एका शेतकऱ्याने चोरट्यांना चकवा देण्यासाठी झोपडी बांधली आहे. जेणेकरुन बाहेरुन पाहिल्यानंतर कोणीही चोरीच्या उद्देशाने आत येऊ नये. मात्र, आत गेल्यावर तो सर्व सामान घेऊन पळून जाईल, अशी स्थिती आहे. 


सर्व सोयी सुविधांनी सज्ज असलेलं घर


या झोपडीला बाहेरुन पाहिल्यावर आत काय असेल याची कोणी कल्पना देखील केली नसेल. बाहेरून गरीब माणसाच्या झोपडीसारखे दिसणारे हे छोटेसे घर आतून आलिशान महालासारखे आहे. एका मोठ्या दिवाणखान्याशिवाय सर्व मानवी सुखसोयी या घरात दिसत आहेत. त्यात एक मॉड्युलर किचन आणि एक अतिशय आलिशान वॉशरुम देखील होते. झोपडीत वॉशिंग मशिन आणि एसी देखील लावला आहे.


घराचा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित 


या झोपडीत असलेल्या सुविधांनी सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ज्या झोपडीला बाहेरुन लोक गरीबाचे घर समजत होते, ते आतून गावातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे घर ठरले आहे. आतमध्ये एक मोठा सोफा, एसी, स्मार्ट टीव्ही आणि वॉशिंग मशीनही दिसत होते. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी त्यावर जोरदार कमेंट केल्या आहेत.


अलिकडच्या काळात लोकांची सर्जनशीलता शिखरावर पोहोचली आहे. कधी कोणाला काय सुचेल हे सांगता येत नाही. याची याची अनेक उदाहरणे समोर येऊ लागली आहेत. लोक सहसा त्यांच्या डोळ्यांनी जे पाहतात त्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत. याचे उदाहरण म्हणजे झोपडीचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ आहे.  




महत्वाच्या बातम्या:


Dhule Shirpur : एबीपी माझाचा इम्पॅक्ट, शिरपूरच्या झोपडीत भरणाऱ्या 14 जिल्हा परिषद शाळांना मिळणार हक्काची इमारत