नवी दिल्ली : सोशल मीडियावर दररोज फोटो, व्हिडिओ व्हायरल होतात. याच फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळे दावे केले जातात. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचाही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्यांनी भरसभेत ‘आय लव्ह यू’ला उत्तर दिल्याचा दावा करण्यात येत आहे.


काय आहे व्हायरल व्हिडिओ?

शिवराज सिंह यांच्या या 12 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी भरसभेत ‘आय लव्ह यू’ला उत्तर दिल्याचा दावा करण्यात येत आहे. एवढंच नाही, तर ‘आय लव्ह यू’ला उत्तर दिल्यानंतर फ्लाईंग किस देण्यात आल्याचंही म्हटलं आहे.

व्हायरल व्हिडिओचं सत्य काय?

17 ऑक्टोबर रोजी शिवराज सिंह चौहान यांचा मध्य प्रदेशातील अशोक नगर येथील मुगावली मतदारसंघामध्ये कार्यक्रम होता. या कार्यक्रमात एक पुरुष ‘’मामाजी, आय लव्ह यू’’ असं म्हणाला. शिवराज सिंहही लगेच आय लव्ह यू म्हणाले आणि त्यांनी फ्लाईंग किस देऊन त्या व्यक्तीला उत्तर दिलं.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना सभेत एक पुरुष समर्थक आय लव्ह यू म्हणाला होता.  ज्याला त्यांनीही उत्तर दिलं. त्यामुळे हा व्हिडिओ खरा असल्याचं एबीपी न्यूजच्या पडताळणीत समोर आलं आहे.