अरुण जेटली यांनी आकडेवारी सादर करुन विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यासोबतच केंद्र सरकारने भारतमाला या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचीही माहिती दिली. येत्या पाच वर्षात सरकार 7 लाख कोटी रुपये खर्च करुन 83 हजार किमीचे रस्ते बांधणार आहे.
काय आहे भारतमाला प्रकल्प?
- या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात 34 हजार 800 किमीचे रस्ते बांधण्यात येतील.
- या टप्प्यात सीमा आणि किनारपट्टीवरील रस्त्यांचा समावेश
- या प्रकल्पामुळे आर्थिक विकास, रोजगार वाढण्यास मदत होईल.
- 10 हजार किमी रस्ता बांधल्यामुळे 4 कोटी दिवसांचा रोजगार निर्माण होईल
- या प्रकल्पाचा 70 टक्के खर्च सरकार करणार आहे. तर उर्वरित खर्च खासगी गुंतवणुकीतून मिळेल.
- या प्रकल्पाची औपचारिक घोषणा दळणवळण मंत्री नितीन गडकरी करतील.