नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संन्यास घेतला होता, अशी एक बातमी सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या हवाल्याने मोदी यांनी स्वतः घर सोडलं नव्हतं, तर त्यांना घरातून हाकललं होतं, असं सांगितलं आहे.


 

 

मात्र 'एबीपी'च्या पडताळणीत ही बातमी चुकीची असल्याचं निष्पन्न झालं आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबाबत सगळ्यांनाच माहित आहे की, त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी अध्यात्माच्या शोधात घर सोडलं होतं. ही गोष्ट मोदी यांनी स्वतःही सांगितलेली आहे.

 

 

काय आहे प्रकरण?

सोशल मीडियात पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या हवाल्याने दिलेली एक बातमी सर्वांनाच विचार करण्यास भाग पाडत आहे. मोदी यांनी संन्यास घेतला होता, अशी बातमी 'अमर उजाला' नावाच्या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेली व्हायरल होत आहे.

 

 

'एबीपी'ने या सर्व प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी प्रल्हाद मोदी यांच्याशी संपर्क साधला. मात्र कोणत्याही वृत्तपत्राला आपण अशा प्रकारची मुलाखत दिली नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच संबंधित वृत्तपत्राला या प्रकरणाचा जाब विचारला असून वृत्तपत्राने चौकशीसाठी वेळ मागितला आहे, असं प्रल्हाद मोदी यांनी सागितलं.

 

 

'अमर उजाला' वृत्तपत्राचा या बातमीशी कोणताही संबंध नसून आमच्या नावाने ही खोटी बातमी व्हायरल केली जात आहे. आम्ही देखील या बातमीची निंदा करते, असं 'अमर उजला' या वृत्तपत्राकडून सांगण्यात आलं आहे.

 

 

त्यामुळे मोदींनी संन्यास घेतल्याची बातमी खोटी असल्याचं एबीपीच्या पडताळणीत निष्पन्न झालं आहे.