नासिरला कुठे आणि कसं पकडलं?
- चेन्नईमधील कॉलेजमध्ये बीई करत असतानाच नासिर 2014 मध्ये दुबईत वेब डेव्हलपर म्हणून नोकरीही करत होता.
- आयएसआयएसच्या प्रोपगेंडा व्हिडीओने प्रभावित होऊन तो सुदानला गेला.
- मात्र सुदानमध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर मागील वर्षी डिसेंबरमध्यो त्याला भारताकडे सुपूर्द करण्यात आलं.
- मुलगा सीरियामधील युद्धात सहभागी होण्यासाठी गेला आहे अशी माहिती नासिरच्या वडिलांनीच दिली.
- नासिरला शोधण्यासाठी त्याचे वडील आमेर मुहम्मद पैकर दुबईहून भारतात पोहोचले होते.
- आमेर यांचा जबाब सीआरपीसीच्या कलम 164 अंतर्गत नोंदवण्यात आला.
- आमेर यांना मुलाविरोधात महत्त्वाचा साक्षीदार म्हणून वापरण्यात येणार आहे.
- एनआयए आमेर आणि नासिरमध्ये झालेले ई-मेल, टेक्स्ट मेसेज आणि व्हॉट्सअॅप मेसेज पुरावे म्हणून सादर करणार आहे.
नासिरचा वडिलांना मेसेज
- आरोपपत्र दाखल होण्यापूर्वीच एनआयएने न्यायाधीश अमर नाथ यांना सांगितलं होतं की, नासिरने सुदानहून वडिलांना भावनिक मेसेज केला होता. मी इथे अतिशय आनंदी आहे, असं त्याने लिहिलं होतं.
- त्याने लिहिलं होतं की आई आणि सुमैयाची काळजी घ्या. मी इथे सुरक्षित आहे. इथलं आयुष्य फारच सुंदर आहे. मला वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी सीरियाला यावं.
नासिर सुदानला कधी आणि कसा पोहोचला?
- 2008: इस्त्रायल, आरएसएस आणि विहिंपविरोधात तिरस्कार पसरवण्यासाठी नासिरने इस्लामिक ऑर्गनायझेशन तामिळनाडू तौहीद जमात (TNTJ) मध्ये प्रवेश केला होता.
- ऑगस्ट 2011: त्याने चेन्नईमधून एथिकल हॅकिंगचा चार महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स केला होता.
- 2014: त्याने मुस्लिम आणि जिदाहींवर होणाऱ्या अत्यचारांबाबत लिहिण्यासाठी वेबसाईट बनवली होती.
- फेब्रुवारी 2015: ट्विटरच्या माध्यमातून नासिर हमीदान नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आला, जो इस्लाम Q&A नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप चालवायचा. इथूनच त्याने आसिससाठी लोगो बनवण्यास सुरुवात केली.
- एप्रिल 2015: मेसेजिंग अॅप टेलीग्रामवर अकाऊंट सुरु केलं आणि आयएसआयएसमध्ये सामिल लोकांच्या संपर्कात आला.
- ऑगस्ट 2015: नासिर नंतर एका मुल्लाच्या संपर्कात आला. त्याने नासिरला सुदान येण्यास सांगितलं, जिथून तो सीरियाला जाऊ शकेल.
- 25 सप्टेंबर 2015: नासिरने विमाने दुबईहून सुदानला रवाना झाला. यानंतर वडिलांना ई-मेल केला की, मी आयएसआयएसमध्ये सामिल होण्यास जात आहे.
- 5 ऑक्टोबर 2015: नासिरला सुदान प्रशासनाने त्याब्यात घेतलं. त्यानंतर 10 डिसेंबरला त्याला भारताकडे सोपवण्यात आलं.