India China Border Live Updates | भारत आणि चीन यांच्या परराष्ट्र मंत्र्याची फोनवरुन चर्चा

चीनने सवयीप्रमाणे पुन्हा एकदा भारतासोबत गद्दारी केली आहे. भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही माहिती दिली आहे. 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात ही हिंसक झडप झाली होती. सुरुवातीला तीन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार चीनचेही 43 जवान मारले गेलेत किंवा जखमी झाले आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Jun 2020 08:37 PM

पार्श्वभूमी

नवी दिल्ली : चीनने सवयीप्रमाणे पुन्हा एकदा भारतासोबत गद्दारी केली आहे. भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही...More

भारत आणि चीन यांच्या परराष्ट्र मंत्र्याची फोनवरुन चर्चा झाली. सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती. दोन्ही देशांच्या शिखर चर्चेत ज्या बाबी एकमताने ठरल्यात, त्याचा दोन्ही देशांनी आदर करावा असं चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यांनी जयशंकर यांना सांगितलं. सध्या आस्तित्वात असलेल्या मार्गानेच दोन्ही देशांनी परस्पर संवाद वाढवावा असंही वांग यांनी सांगितलं.