कानपूर : कानपूरच्या चौबेपूरमध्ये पोलीस हत्याकांडाचा मुख्य आरोपी विकास दुबेला 154 तासांनंतर उज्जैनच्या महाकाल मंदिरात अटक करणायत आली. काय काय घडल या 154 तासांत? कसा उत्तरप्रदेश पोलिसांनी विकास दुबे याचं साम्राज्य जमीनदोस्त केलं? पाहा या रिपोर्ट मध्ये.


चकमकीच्या रात्री कुख्यात गुंड विकास दुबे हा शेतातील रस्त्याने सायकलीवरून गावातून फरार झाला. जवळपास 5 किलोमीटरवर असलेल्या शिवली येथे पोहोचून त्याने आपल्याकडील मोबाईल बंद केला आणि आपल्या विश्वासातील एका साथीदाराकडून मोटरसायकल घेऊन तो पसार झाला. घटनेनंतर पाच दिवस उलटून गेले. मात्र, विकास दुबेचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागू शकला नाही. त्याचा शोध सुरूच आहे.


साथीदार अमर दुबेचा एन्काउंटर


गँगस्टर विकास दुबे फरार असला तरी, त्याच्या साथीदारांची धरपकड केली जात आहे. त्याचवेळी त्याचा 'डावा हात' समजला जाणारा अमर दुबे याला एन्काउंटरमध्ये ठार केलं आहे. हमीरपूर येथे चकमकीदरम्यान पोलिसांच्या हातून अमर मारला गेला. तर फरीदाबाद येथून विकासच्या आणखी एका साथीदाराला पकडण्यात आले आहे. विकास दुबे अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही.


Vikas Dubey Arrested: कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला उज्जैनमधून अटक


फरीदाबादमधील हॉटेलावर छापा
विकास दुबेच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापेमारी करण्यात येत असून, मंगळवारी संध्याकाळी पोलिसांनी फरीदाबादमधील एका हॉटेलवर धडकले. तेथे पोलिसांनी विकास दुबेच्या एका साथीदाराला अटक केली. तसेच एका नातेवाइकालाही पकडण्यात आले आहे. पोलिसांनी हॉटेलातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, त्यात विकास दुबेसारखी एक व्यक्ती दिसत आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.


विकास दुबेला जेरबंद करण्यासाठी गेलेले डेप्युटी एसपी देवेंद्र मिश्र यांच्यासह 3 सब इन्स्पेक्टर आणि 4 कॉन्स्टेबल्स शहीद झाले.


बरं विकास दुबे काही एका रात्रीतून जन्माला आला नाही. गेली तीस वर्ष वेगवेगळ्या सरकारांच्या आशीर्वादानं विकास दुबेनं यूपीत धुमाकूळ घातलाय.


कोण आहे विकास दुबे?




  • विकास दुबे मूळचा कानपूरजवळच्या बिकरु गावचा आहे.

  • हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी असे किमान 60 हून अधिक गुन्हे दुबेवर दाखल आहेत.

  • 2001 मध्ये तर पोलीस स्टेशनमध्ये घुसून त्यानं भाजपचे राज्यमंत्री संतोष शुक्लांची हत्या केली होती.

  • त्या प्रकरणात एकाही पोलिसाची विकास दुबेविरोधात कोर्टात साक्ष देण्याची हिंमत झाली नाही.

  • बसपाच्या काळात विकास दुबेचा दबदबा वाढला. कानपूर आणि परिसरात त्याची दहशत वाढली.

  • याच काळात सरकारी कंत्राटापासून ते शाळा-कॉलेज उभी करुन त्यानं करोडोची संपत्ती उभी केली.

  • बिकरुसह आजूबाजूच्या गावांमध्ये विकास दुबेच्या परवानगीशिवाय कुणी ग्रामपंचायतीलाही उभं राहू शकत नाही.

  • गेल्या 15 वर्षात एकदाही बिकरु गावात निवडणूक झाली नाही, शिवाय झेडपीतही दुबेच्याच कुटुंबाचा सदस्य निवडून जातो.

  • आताही विकास दुबेची पत्नी ऋचा दुबे झेडपी सदस्य आहे

  • दुबेला दोन मुलं आहेत, त्यातला एक इंग्लंडमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेतोय, तर दुसरा कानपूरमध्येच शिकतोय.


Vikas Dubey Arrested | कानपूरमध्ये आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणारा कुख्यात गुंड विकास दुबे अखेर अटकेत