India Global Week 2020 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनमधील आयोजित 'इंडिया ग्लोबल वीक 2020'चं वर्च्युअल उद्घाटन करण्यात आलं. कोरोना संकट काळात पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासोबतच संबोधनही केलं. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने प्रत्येक संकटाशी दोन हात केले असून वेळोवेळी विजयी झाला आहे, याला इतिहास साक्षी आहे. आपण एकीकडे कोरोनाशी लढा देत आहोत, तर दुसरीकडे लोकांच्या आरोग्यासोबतच अर्थव्यवस्थेच्या आरोग्याकडेही सरकारचं लक्ष आहे. यावेळी बोलताना मोदींनी इतर गोष्टींचा उल्लेखही केला. दरम्यान, इंडिया ग्लोबल वीक तीन दिवस सुरु राहणार आहे.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'महामारीने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, भारतातील औषधी उद्योग हा केवळ भारताची मालमत्ता नाही, तर संपूर्ण जगासाठी आहे. औषधांचा खर्च कमी करण्यात भारताने अग्रणी भूमिका बजावली आहे. विशेषत: विकसनशील देशांसाठी. 'आत्मनिर्भर भारत' याचा अर्थ स्वतःपुरतचं मर्यादीत असावं असं नाही. याचा अर्थ आहे 'सेल्फ सस्टेनिंग' आणि 'सेल्फ जेनरेटिंग' होणं असा आहे.'


पाहा व्हिडीओ : आरोग्यासोबतच अर्थव्यवस्थेच्या आरोग्याकडेही लक्ष : नरेंद्र मोदी



पंतप्रधान मोदी बोलताना म्हणाले की, 'सध्याच्या घडीला सगळं जग कोरोनावर लस शोधतं आहे. अशात भारत ही लस शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सध्याच्या घडीला आपल्या कंपन्याही जगभरात लस शोधण्यासाठी मदत करत आहेत.' इंडिया ग्लोबल वीक 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोल होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, 'ज्या देशांमध्ये खुली अर्थव्यवस्था आहे, अशा देशांपैकी भारत एक आहे. आम्ही जगभरातल्या गुंतवणूकदारांचं भारतात स्वागत करतो. देशातील फार्मा उद्योग हा फक्त भारतासाठीच नाही तर जगासाठी महत्त्वाचा ठरतो आहे.'


पहिल्यांदा इंडिया ग्लोबल वीकचं वर्च्युअली आयोजन


इंडिया ग्लोबल वीक 2020 दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. कोरोनामुळे यंदा पहिल्यांदाच इंडिया ग्लोबल वीकचं वर्च्युअली आयोजन करण्यात आलं आहे. असं मानलं जात आहे की, जागतिक स्तरावर आतापर्यंतची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स आहे. ज्यामध्ये जगभरातील 5000 हून अधिक लोक सहभागी असणार आहेत. तर अडिचशेहून अधिक वक्ते सहभागी होणार आहेत. तीन दिवसांपर्यंत सुरु राहणाऱ्या या परिषदेत व्यापार, राणनिती आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


सीबीएसई बोर्डाच्या 10 वी, 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर


परीक्षांबाबत फेरविचार नाही, यूजीसीच्या गाईडलाईन बंधनकारक : UGC उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन


कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला उज्जैनमधून अटक