नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने 182 पैकी 99 जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवलं आहे. एका अपक्ष आमदारानेही भाजपला पाठिंबा दिल्याने हा आकडा आता 100 झाला आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण असेल, हे जाहीर करण्यात आलं.
गुजरात निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, याबाबत मोठी चर्चा सुरु होती. अखेर पुन्हा एकदा विजय रुपाणी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या अगोदरच्या कार्यकाळातही मुख्यमंत्री विजय रुपाणीच होते, आता पुन्हा एकदा त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला, मात्र काँग्रेस त्यांचा चांगलाच घाम काढला. गुजरातमध्ये 182 पैकी दीडशे जागा जिंकू असं छातीठोकपणे सांगणाऱ्या, भाजप अध्यक्ष अमित शाह यांना शंभर जागांवरच विजय मिळवता आला.
गुजरातमध्ये भाजपला 99, काँग्रेस 77, राष्ट्रवादी काँग्रेस 1, अपक्ष 3 आणि इतर पक्षांनी 2 जागा मिळवल्या.
गुजरात विधानसभेतील पक्षीय बलाबल
- भाजप - 99
- काँग्रेस - 77
- राष्ट्रवादी काँग्रेस - 1
- भारतीय ट्रायबल पार्टी - 2
- अपक्ष - 3
एकूण - 182
संबंधित बातम्या :
सत्ता आली, पण मोदींच्या जन्मगावात भाजपचा पराभव
पुढच्या वर्षी कर्नाटक, मध्य प्रदेशसह या 8 राज्यात निवडणुका
देशातील 29 पैकी 19 राज्यात भाजप-एनडीएची सत्ता
गुजरात, हिमाचलनंतर सर्वांची नजर आता कर्नाटकवर
हा विजय विकासाचा, देश बदलासाठी तयार : मोदी
गुजरात : काँग्रेसची मतांची टक्केवारी 10 टक्क्यांनी वाढली
गुजरातमध्ये सत्ता राखली, हिमाचलमध्ये सत्ता बदलली!