मुंबई : कर्जबुडव्या उद्योगपती विजय माल्ल्याची फ्रान्समधील 1.8 मिलियन युरोची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने याबाबत सांगितलं की, विजय माल्ल्याची फ्रान्समधील 14 कोटींची मालमत्ता मनी लाँन्ड्रिंग कायद्यांतर्गत जप्त करण्यात आली आहे.



जानेवारी 2019 मध्ये विजय माल्ल्याला मनी लाँन्ड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत कोर्टाने 'फरारी आरोपी' घोषित केले होते. मार्च 2019 पासून तो लंडनममध्ये राहत आहे. भारत सरकार विजय माल्ल्याच्या प्रत्यर्पणासाठी प्रयत्न करीत आहे.