नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन संपूर्ण भारतात सुरू आहे. जोपर्यंत सरकार कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन देशातील प्रत्येक राज्यात आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तसेच 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक दिली आहे.


संशोधन नको, कायदा मागे घ्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. प्रत्येक राज्यात शेतकरी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.


दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेलं शेतकरी आंदोलन आता नवव्या दिवसात पोहचलं आहे.आंदोलन आता नवव्या दिवसात पोहचलं आहे. आंदोलन दिल्लीच्या सीमेवर धडकल्यानंतर सरकारने काल दुसऱ्यांदा शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. उद्या 5 डिसेंबरला दुपारी दोन वाजता पुन्हा शेतकरी आणि सरकारमध्ये बैठक होणार आहे. कोण किती मागे सरकतंय आणि तोडगा दृष्टीपथात आहे का याची उत्तर त्यानंतरच मिळतील.


कालच्या बैठकीत शेतकऱ्यांनी सरकारचं जेवणही नाकारलं. त्यांनी लंगरमधलं जेवणच खाणं पसंत केलं होतं. यावरुन सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमधली विश्वासाची दरी किती लांब आहे दिसतं. दुसरीकडे प्रकाशसिंह बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार परत केला. इतरही अनेक खेळाडू उद्या अवॉर्ड वापसी करणार आहेत. वाहतूकदार, वकिलांच्या संघटनाही शेतकऱ्यांसाठी पुढे येतायत. त्यामुळेच हा वाढता दबाव सरकार कसा हाताळणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.