भोपाल : वेगाचा थरार आणि बाईक रायडिंगमधील आघाडीचं नाव असलेल्या लेडी बायकर वीनू पालीवाल यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. 40 वर्षीय वीनू या बाईकवरून देशभ्रमंतीला निघाल्या होत्या. मात्र त्यांचा हा प्रवास पूर्ण होण्याआधीच त्यांना काळाने गाठलं.
वीनू आणि त्यांचा मित्र दीपेश हे 24 मार्चपासून 'हार्ले डेविडसन'वरून देशभ्रमंतीसाठी निघाले होते. दोघेही आपापल्या बाईक्स घेऊन मध्य प्रदेशातील सागर इथून भोपाळला जात होते. मात्र यादरम्यान ग्यारसपूर इथं वीनू यांची बाईक स्लिप झाली.
वीनू यांच्या बाईकने वेग पकडला असल्यामुळे या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
वीनू पालीवाल हे बाईक रायडिंग क्षेत्रातील आघाडीचं नाव आहे. एक महिला असूनही त्यांनी या क्षेत्रात दबदबा निर्माण केला होता. गेल्या वर्षापासून त्यांनी हार्ले डेविडसन 48 मॉडेलवरून हॉग रॅली पुरी केली होती. त्यामुळेच त्यांना 'लेडी ऑफ द हार्ले 2016' या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
वीनू यांचं ड्रायव्हिंग अत्यंत सहज होतं. हार्ले डेविडसन या बाईकवर तर त्यांचा चांगलाच हात बसला होता. त्यामुळेच तब्बल 180 च्या स्पीडनेही त्या हार्ले डेविडसन चालवत होत्या. मात्र आज त्यांच्या अपघाती मृत्यू झाला.