Prashant Kishor : पुढच्या काही महिन्यांमध्ये 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये निवडणूक आयोगाकडून या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निवडणुकांबाबत  राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी निवडणूक आयोगाला एक सल्ला दिला आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांमध्ये लसीकरण वाढवण्याची मागणी प्रशांत किशोर यांनी केली आहे. निवडणुका होणाऱ्या राज्यामंध्ये 80 टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. कमीत कमी 80 टक्के लोकांनी लसीचे 2 डोस घेतले पाहिजेत असे प्रशांत किशोर म्हणाले. 


सध्य देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण करणे गरजेचे असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. प्रशांत किशोर हे 2024 च्या निवडणुकांची तयारी कतर असल्याची चर्चा सुरू आहे. ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांच्यासाठी, सध्या रणनीतीकार म्हणून काम करत असल्याचे बोलले जात आहे. मागच्या काही दिवसांमध्ये काँग्रसचे अनेक नेते तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. यावरुन प्रशांत किशोर यांच्यावर आरोप देखील  केले जातायेत. कारण, ज्या नेत्यांनी काँग्रेस सोडली ते नेते सतत प्रशांत किशोर यांच्या संपर्कात होते.


दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाची बैठक पार पडली होती. यामध्ये मुख्य निवडणुक आयुक्तांबरोबर अन्य महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये वाढती कोरोना रुग्णांची संख्या आणि होणाऱ्या निवडणुका यावर चर्चा झाली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नियमावलीमध्ये थोडा बदल करण्याचा आयोगाचा विचार आहे. दरम्यान, आज आणखी निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये निवडणुकीच्या संदर्भातील नियमावली जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, यापूर्वी निवडणुक आयोगाने निती आयोग आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबरोबर देखील एक बैठक केली होती. या बैठकीमध्ये निवडणुकांच्या प्रचारात निघणाऱ्या रॅलींमध्ये होणाऱ्या गर्दीवर चर्चा करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकांच्या तारखा घोषीत केलेल्या नाहीत. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे प्रचारासाठी काढण्यात येणाऱ्या रॅलींवर बंधने आणली जाऊ शकतात. 


दरम्यान, गुरूवारी निवडणूक आयोगाने या 5 राज्यांमधील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि अन्य आरोग्य क्षेत्रातील तज्ञ उपस्थित होते. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने गृह सचिव अजय भल्ला यांच्याबरोबर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या 5 राज्यांमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला.  दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये 2017 मध्ये विधनसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्याच्या तारखा या 4 डिसेंबर 2016 ला जाहीर केल्या होत्या. त्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये 7 टप्प्यात निवडणुका पार पडल्या होत्या.  उत्तर प्रदेशमधील 17 व्या विधानसभेचा कालावधी हा 15 मे पर्यंत आहेत. मागच्या वर्षाचा विचार केला तर यावेळी उत्तर प्रदेसमध्ये 8 टप्प्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पंजाबमध्ये 3 टप्प्यात तर उत्तराखंडमध्ये एका टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.


महत्वाच्या बतम्या: