Uttarakhand News: उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉलचे पालन न करणे एका अधिकाऱ्याला चांगले महागात पडले आहे. मुख्यमंत्र्याचा प्रोटोकॉलचे पालन न केल्याने एक अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्यात आली असून त्याची बदली करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मु्ख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) कोटद्वार (Kotdwar) मध्ये आलेल्या आपत्तीची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्याचे झाले असे की, मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यावेळी तैनात असलेले एएसपी प्रोटोकॉल विसरले आणि फोनवर बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना सॅल्युट केले. त्यानंतर आता त्यांची बदली करण्यात आली आहे.
हा प्रकार काही दिवसांपूर्वीचा आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आपत्तीचा आढावा घेण्यासाठी कोटद्वार जिल्ह्यात पोहोचले होते. सीएम धामी हेलिकॉप्टरमधून कोटद्वारमध्ये उतरले तेव्हा एएसपी शेखर सुयाल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी त्यांना रिसिव्ह करण्यासाठी आले होते. मात्र यादरम्यान एएसपी शेखर सुयाल प्रोटोकॉल विसरले. मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल विसरून सीएम धामी हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतरही ते फोनवर बोलतच राहिले आणि फोनवर बोलतच त्यांनी मुख्यमंत्र्यांना सॅल्युट केले.
पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली
अतिरिक्त पोलीस अधीक्षक शेखर सुयाल यांनी मुख्यमंत्र्यांना सॅल्युट केले, मात्र ते फोनवर बोलतच राहिले. राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि एक अतिरिक्त एसपी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून फोनवर बोलत राहतो, ही कृती मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल मोडल्याची मानली जाते. सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. हे प्रकरण माध्यमांसमोर आल्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एएसपी शेखर सुयाल यांना एएसपी कोटद्वार येथील पदावरून हटवून त्यांची पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. ही पोस्टिंग पोलिस खात्याची शिक्षा म्हणून मानली जाते.
या विषयावर सध्या एकही पोलीस अधिकारी बोलण्यास तयार नाही. पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रया आलेली नाही. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तर नियमित पोस्टिंग आहे. पण ज्या प्रकारे हे प्रकरण माध्यमांसमोर आले त्यानंतर लगेचच शेखर सुयाल यांना कोटद्वार येथून नरेंद्र नगर पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. तो थेट नियमभंग मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल आणि या पोस्टिंगकडे शिक्षा म्हणून पाहिले जात आहे.
हे ही वाचा :