मुंबई: पाच राज्यातील निवडणुकांचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांचे निकाल हाती येत आहेत.
मात्र गोवा आणि उत्तराखंडमध्ये दिग्गजांना धक्के बसले आहेत. या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा मांद्रेम मतदार संघातून पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार दयानंद सोपटे यांनी पार्सेकरांचा पराभव केला.
तर तिकडे उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री हरिश रावत यांचाच पराभव झाल्याने, काँग्रेसला जोरदार धक्का बसला. उत्तराखंडमद्ये हरिश रावत दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. या दोन्हीही ठिकाणी त्यांचा पराभव झाला.
हरिद्वारमध्ये हरिश रावत यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला.
तर किच्चा मतदारसंघातून रावत 92 मतांनी हरले.