मणिपूरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 31 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे स्थानिक पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत आहेत.
मणिपूरमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप - 21
काँग्रेस - 26
नागा पीपल फ्रंट - 4
नॅशनल पीपल्स पार्टी - 4
तृणमूल काँग्रेस -1
अपक्ष - 1
लोकजनशक्ती पार्टी - 1
-------------------------------
एकूण - 58 (60)
इरोम शर्मिला यांचा पराभव
मणिपूरची आयर्न लेडी अशी ख्याती असलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र शर्मिला यांना पराभवाचा जबर धक्का बसलेला आहे. मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांनी इरोम शर्मिलांना पराभवाची धूळ चारली.
पिपल्स रिसर्जन्स अँड जस्टिस अलायन्स (प्रजा) च्या प्रमुख असलेल्या इरोम चानू शर्मिला मणिपूरमधील थोबल मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या. विशेष म्हणजे शर्मिला यांना अवघी 90 मतं मिळाली आहेत. शर्मिला यांनी मुख्यमंत्रिपद भूषवण्याची इच्छाही काही महिन्यांपूर्वी बोलून दाखवली होती.
या पराभवानंतर इरोम शर्मिला यांनी यापुढे कधीही निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली.
संबंधित बातम्या
गोव्यात सर्वाधिक मतदारांची ‘नोटा‘ला पसंती
चार राज्यात भाजपचं सरकार, उद्या मुख्यमंत्री ठरवू : अमित शाह
EVM घोटाळा करुन भाजपचा विजय, निकाल रद्द करुन फेरमतदान घ्या : मायावती
विजयाबद्दल पंतप्रधान मोदी आणि भाजपचं अभिनंदन : राहुल गांधी
UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल
Punjab Assembly Election Result 2017: पंजाबचा निकाल
Uttarakhand Assembly Election Result 2017 : उत्तराखंडचा निकाल
Manipur Assembly Election Result 2017: मणिपूरचा निकाल लाईव्ह
Assembly Election Result 2017 : पाच राज्यांत कोणाची सत्ता?
LIVE UPDATE :
- #ABPResults– मणिपूर : भाजप 22, काँग्रेस 20, तृणमूल 0, इतर 10 जागांवर आघाडी
- #ABPResults– मणिपूर : भाजप 16, काँग्रेस 12, इतरांना 7 जागांवर आघाडी
- मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांचा पराभव, मुख्यमंत्री ओकराम इबोबीसिंग विजयी
- #ABPResults– मणिपूर : भाजप 3, काँग्रेस 7, तृणमूल 0, इतर 3
मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ 18 मार्च रोजी पूर्ण होत आहे.