नवी दिल्ली : महिलांच्या जिन्सवरुन वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या  उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी पुन्हा एकदा त्यांच्या इतिहासाच्या ज्ञानाचा परिचय करुन दिला आहे. ते म्हणाले, भारत 200 वर्षे अमेरिकेचा गुलाम होतं. ज्या अमेरीकेनं जगावर राज्य केलं, तोच अमेरीका अता कोरोना काळात संघर्ष करत आहे. भारतावर अमेरिकेने नाही तर ब्रिटनने राज्य केले होते. 


आपत्ती काळात ज्यांनी अधिक मुलांना जन्म दिला, त्याला अधिक मदत मिळाली, आणि ज्यांनी कमी मुलांना जन्म दिला. त्यांना कमी मदत मिळाली. असं विचित्र वक्तव्य ही तीरथसिंग रावत यांनी केलं आहे. 


 




 उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं  होतं. आजकाल महिला फाटलेली जीन्स घालतात, हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत? महिलेच्या गुडघ्यावर फाटलेली जीन्स पाहून मनात प्रश्न येतो की यामुळं समाजात काय संदेश जाईल, मुलांवर कसे संस्कार होतात, हे सर्वस्वी पालकांवर असतं, असं तीरथ सिंह यांनी म्हटलं होतं.


तीरथ सिंह रावत म्हणाले होते की, ''मी जयपूरला एका कार्यक्रमासाठी जात होतो. जहाजातून प्रवास करत असताना तिथे एक महिला आपल्या 2 मुलांसोबत होती आणि तिने गुडघ्यावर फाटलेली जीन्स घातली होती. मी जेव्हा तिला विचारलं की तुम्हाला कुठे जायचं आहे? तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की मी दिल्लीला जात आहे. मी एक स्वयंसेवी संस्था चालवते, असं तीनं मला सांगितलं, असं तीरथ सिंह रावत म्हणाले.  रावत म्हणाले की, तेव्हा मी विचार केला की, जर स्वयंसेवी संस्था चालवणारी महिला असे कपडे परिधान करत असेल, तर ती समाजाला कशाप्रकारे संस्कार घडवेल? आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं कधीच नसायचं, असंही तीरथ सिंह यांनी म्हटलं आहे. रिप्‍ड जीन्स संदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. 


संबंधित बातम्या :


अमिताभ बच्चनची नात उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर भडकली! म्हणाली, मी रिप्‍ड जीन्स अभिमानानं घालणार


महिलांनी काय परिधान करावं किंवा कसं रहावं यावर न्यायाधीशांनी टिप्पणी करु नये, सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला