मुंबई : भारतात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 24 तासात 43,846 कोरोनाचे नवे रुग्ण देशात आढळले आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा 1,15,99,130 वर गेला आहे. तर देशात 3,09,087 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.


आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात असे काही राज्य आहेत की, ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि हरियाणा ही राज्ये प्रामुख्याने येतात. 



  • महाराष्ट्र - पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहे.

  • तामिळनाडू- चेन्नई, चेंगलपट्टू, तिरुवल्लूर, तंजावर  जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहे.

  • पंजाब- जलंधर, एसएएस नगर, पटियाला नगर, होशियारपूर  जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहे.

  • मध्यप्रदेश- इंदौर, भोपाल, उज्जैन, जबलपूर आणि ग्वालियार  जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहे.

  • कर्नाटक- सुरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि भावनगर  जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहे.

  • हरियाणा- गुरुग्राम, कर्नाळस पंचकुला आणि अंबाला  जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहे.


अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या


 महाराष्ट्रात 1,92,294, तमिलनाडूमध्ये 7291, पंजाबमध्ये 16988, मध्य प्रदेशात 7344, दिल्लीत  3409, कर्नाटकात 12847, गुजरातमध्ये 6737 आणि हरियाणा में 4830 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर भारतात रूग्ण बरे होण्याचा म्हणजे रिकव्हरी रेट 95.96 टक्के आणि मृत्यू दर 1. 38 टक्के आहे. 


संबंधित बातम्या :


Maharashtra Corona Cases Update | राज्यात नव्या कोरोना रुग्णांचा चढता आलेख; आज आढळले इतके रुग्ण...


Pimpri Chinchwad | वाढत्या कोरोनामुळं पिंपरी चिंचवडमध्ये आता 'हे' नवे आदेश