Kanpur Road Accident : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघातात झालाय. या अपघातात 25 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत.  मृतांचा अकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. काणर जखमींपैकी  काहींची प्रकृती चिंताजनक आहे. नवरातीरानिमित्त उन्नाव येथील चंद्रिका देवीच्या मंदिरातून दर्शन घेऊन हे सर्वजण कोरथा गावात परतत असताना हा अपघात झालाय. सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. 


उत्तर प्रदेशमधील 50 भाविक उन्नाव येथील चंद्रिका देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना वेगात असलेला ट्रक्टर उलटला.  ट्रॅक्टर ट्रॉली पाण्याने भरलेल्या शेतात पडली. त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये अडकलेल्या लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.


पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना मदत करणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. कार्यालयाकडून जारी केलेल्या याबाबत ट्विट करून घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. 'कानपूरमधील ट्रॅक्टर अपघाताच्या बातमीने दु:ख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींसाठी प्रार्थना करण्यासह  स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे. पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये दिले जातील, अशी माहिती पीएमओने दिली आहे. 






प्रशासनावर आरोप 
घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या. मात्र, प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली असती तर आणखी जीव वाचू शकले असते.