मुंबई : देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या सत्तेचं सूत्र हाती घेताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नवनव्या निर्णयांचा सपाटा लावला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काही योजनांनी आदित्यनाथ प्रभावित झाले असून त्यांनी फोन करुन विकासकार्यासाठी मदत मागितली आहे.

महाराष्ट्रात फडणवीस सरकारने राबवलेल्या पाच यशस्वी योजना यूपीमध्ये रुजवण्याचा आदित्यनाथांचा मानस असून तसे प्रयत्नही त्यांनी सुरु केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन योगी आदित्यनाथ यांनी काही योजनांसंदर्भात माहिती मागवली आहे. 'भास्कर न्यूज'ने याबाबत वृत्त दिलं आहे.

उत्तर प्रदेशचा वेगाने विकास करण्याच्या दृष्टीने आदित्यनाथांनी फडणवीस सरकारकडे मदत मागितली आहे. मुंबईतील वायफाय, महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातील जलयुक्त शिवार योजना, सहकार क्षेत्रातील काही योजनांबाबत यूपी सरकारने माहिती मागवली आहे.

मंत्रालयातील अधिकारी याबाबत माहिती गोळा करण्याच्या तयारीत गुंतले आहेत. गरज पडल्यास महाराष्ट्रातील अधिकारी या योजनांची माहिती देण्यासाठी लखनौच्या दौऱ्यावर जाण्याचीही शक्यता आहे.

कोणत्या योजनांचा समावेश

वायफाय नेटवर्क : फडणवीस सरकारच्या आयटी विभागाकडून मुंबईत सुरु करण्यात आलेली वायफाय नेटवर्क योजना. हे सार्वजनिक भागातील जगातलं सर्वात मोठं वायफाय नेटवर्क मानलं जातं. सध्या इथे 400 हॉटस्पॉट कार्यरत असून ही संख्या एक मे पासून 1200 पर्यंत वाढवण्यात येणार आहे.

आपले सरकार : आपले सरकार या वेबसाईटच्या माध्यमातून जनता आपल्या तक्रारी सरकारच्या विविध विभागांपर्यंत थेट पोहचवू शकते.

जलयुक्त शिवार : महाराष्ट्रातील मराठवाड्यासारख्या काही भागांप्रमाणेच उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडमध्येही दुष्काळाची समस्या आहे. त्यामुळे या धर्तीवर यूपीमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवण्याचा आदित्यनाथांचा इरादा आहे. यापूर्वी राजस्थान सरकारनेही जलयुक्त शिवार योजनेत रस दाखवला होता.

संबंधित बातम्या :


बिहार, गुजरातनंतर उत्तर प्रदेशातही दारुबंदी?


3 दिवस, 5 निर्णय, योगी आदित्यनाथांचा धडाका


व्हायरल सत्य : अखिलेश यादव हे योगी आदित्यनाथ यांचे...


निवडणूक प्रचारात घोषणा, सत्तेत येताच कत्तलखान्यांवर कारवाई


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योग्य आदित्यनाथ यांची संपत्ती किती?


कोणत्याही मंत्र्यांनं लाल दिव्याची गाडी वापरु नये: योगी आदित्यनाथ


योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्याच दिवशी पाच घोषणा