Utkarsh Samaroh : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील भरूच येथे आयोजित 'उत्कर्ष समारंभ'ला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि ते भावूक झाले. या कार्यक्रमाला पंतप्रधना नरेंद्र मोदींबरोबर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते. 


कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आजचा कार्यक्रम म्हणजे आमचे सरकार प्रामाणिक आहे आणि एक संकल्प घेऊन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणारे सरकार आहे याचा पुरावा आहे. गुजरात सरकारच्या सामाजिक सुरक्षेशी संबंधित चार योजनांच्या शंभर टक्के योगदानाबद्दल मी भरूच जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करतो."






लाभार्थीशी बोलताना पंतप्रधान झाले भावूक  


या कार्यक्रमात आयुब पटेल नावाच्या व्यक्तीने आपल्या दोन्ही मुलींना डॉक्टर बनविण्याचे स्वप्न बोलून दाखवले. तसेच, मुलींचीही हे स्वप्स साकार करण्याची इच्छा आहे. त्यांच्या या बोलण्यावर पंतप्रधान भावूक झाले आणि त्यांनी मदतीची तयारी दर्शवली. पंतप्रधान म्हणाले,  "तुमच्या मुलींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला कळवा," 


कार्यक्रमात 13 हजार लाभार्थ्यांची ओळख पटली


गुजरातमधील भरूच येथे हा कार्यक्रम सकाळी 10:30 च्या दरम्यान सुरु झाला. या कार्यक्रमात 100% लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी चार सरकारी योजना अधोरेखित करण्यात आल्या. वास्तविक, उत्कर्ष उपक्रमांतर्गत विधवा, वृद्ध आणि निराधारांना आर्थिक सहाय्य देणाऱ्या 4 सरकारी योजनांतर्गत सुमारे 13 हजार लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. 


महत्वाच्या बातम्या :