UPSC CSE Prelims Result declared 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगानं (यूपीएससी) सिव्हील सर्व्हिसेस पूर्व परीक्षा 2020 {UPSC Prelims Result} चा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेनंतर अवघ्या 19 दिवसात निकालाची घोषणा यूपीएससीनं केली आहे. काल 23 ऑक्टोबर 2020 रोजीच या निकालाची घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थी हा निकाल ऑफिशियल वेबसाईट upsc.gov.in किंवा upsconline.nic.in वर जाऊन पाहू शकतात. आयोगाने यूपीएससी सीएस पूर्व परीक्षा 2020 परीक्षेसह भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा 2020 चा देखील निकाल जाहीर केला आहे.
यूपीएससी पूर्व परीक्षा 2020 साठी 10 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. परीक्षा नियमांनुसार जे विद्यार्थी या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेत त्यांचा निकाल घोषित केला आहे. आता या विद्यार्थ्यांना यूपीएससी सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा 2020 साठी विस्तृत फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म यूपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईट वर 28 ऑक्टोबर 2020 ते 11 नोव्हेंबर 2020 च्या सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत विद्यार्थी भरु शकतील.
या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. यूपीएससी सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा 2020 साठी अॅडमिट कार्ड आणि परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेच्या आधी 3-4 आठवडे येण्याची शक्यता आहे.
जर विद्यार्थ्यांनी आपला पत्ता, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी बदलला असेल तर तशी माहिती आयोगाकडे देणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेची अन्सर की, मार्क्स आणि कट ऑफ़ मार्क्स याची पूर्ण माहिती यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा 2020 चा अंतिम निकाल लागल्यानंतर देणार आहे.