मुंबई : अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीने त्यांच्या सरकारला एक अहवाल सादर केला. जगात कुठे काय सुरु आहे, त्याचा अमेरिकेवर काय परिणाम होणार याचं विश्लेषण अशा अहवालात केलं जातं. त्यात भारत पाकिस्तानचे ताणलेले संबंध, 7 ते 10 मे या काळात झालेले युद्ध, चीनची पाकिस्तानवर होणारी लष्करी आणि आर्थिक मदतीची खैरात अशा गोष्टींचा उल्लेख केला आहे. भारत चीनला मुख्य प्रतिस्पर्धी मानतो हे सुद्धा त्या अहवालात म्हटलं आहे.
भारताच्या दृष्टीनं चीनच प्रमुख शत्रू आहे, चीनच्या तुलनेत पाकिस्तान दुय्यम समस्या आहे असं भारत मानतो असं निरीक्षण अमेरिकेतील डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीच्या ताज्या अहवालात नोंदवलं आहे. या अहवालात पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीचा उल्लेखही करण्यात आला आहे. जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यावर आणि भारताची लष्करी ताकद वाढवण्यावर पंतप्रधान मोदींचा भर राहील असं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं आहे.
जगभरात कोणत्या देशात काय सुरु आहे, कुठे तणाव आहे, कुणाला कोणापासून धोका आहे, कोणते देश जवळ येत आहेत अशा गोष्टींचा उल्लेख अमेरिकेच्या या अहवालात केला जातो.
US Defence Intelligence Annual Report : अमेरिकेच्या अहवालात काय म्हटलंय?
- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संरक्षणविषयक तीन प्रमुख गोष्टींना प्राधान्य राहील.
- जागतिक स्तरावर नेतृत्व करणे, चीनच्या कुरापतींवर मात करणे आणि भारताची लष्करी ताकद वाढवण्यावर मोदी सरकारचा भर असेल.
- भारत चीनलाच आपला प्रमुख शत्रू मानतो. पाकिस्तान ही भारतासाठी काहीशी दुय्यम समस्या आहे.
- चीनचा धोका कमी करण्यासाठी भारत विविध देशांसोबत हिंद महासागरात सराव, प्रशिक्षण, शस्त्रास्त्र विक्री आणि माहिती शेअर करत मैत्री वाढवत आहे.
- इंडो-पॅसिफिक भागात भारत द्विपक्षीय, त्रिपक्षीय सहभाग वाढवत आहे.
- ब्रिक्स, शांघाय कोऑपरेशन ऑरगनायजेशन आणि आसियान सारख्या बहुपक्षीय मंचांवर भारत सक्रिय सहभाग वाढवत आहे.
- संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यावर, 'मेड इन इंडिया' वर भारताचा भर कायम असेल.
- 2025 मध्ये देखील भारत रशियासोबत चांगले संबंध राखेल.
- आर्थिक आणि लष्करी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रशिया भारताचा महत्त्वाचा मित्र आहे.
- मोदी सत्तेत आल्यापासून भारतानं रशियाकडून लष्करी सामग्री घेणं कमी केलं आहे.
- चीन-पाकिस्तानसोबतच्या युद्धात भारत रशियन बनवाटीचे रणगाडे, लढाऊ विमानांवरच अवंलबून आहे.
- त्यांच्या देखरेखीसाठी सुटे भाग मिळवण्यासाठी रशियासोबत चांगले संबंध असणं भारतासाठी महत्त्वाचं आहे.
- रशिया-चीनमध्ये वाढती जवळीक जास्त घट्ट होऊ नये यासाठी भारत रशियासोबत चांगले संबंध राखेल.
चीनच्या आर्थिक आणि मिलिटरी खैरातीवर पाकिस्तान तगून राहील आणि चीनच्या जोरावर आपला भारताविरोध कायम राखेल असंही अहवालात म्हटलं आहे. प्रत्येक खंडातील, प्रत्येक देशाची संरक्षण सज्जता कशी आहे, शेजारी देशांशी संबंध कसे आहेत, त्याचा अमेरिकेवर काय परिणाम होईल याचा बारकाईने अभ्यास केलेला या अहवालातून दिसून येतं.
ही बातमी वाचा: