Tej Pratap Yadav Anushka Yadav Relationship : बिहारची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील कलह समोर आला आहे. आपल्या विवाहबाह्य रिलेशनशिपची जाहीर कबुली देणाऱ्या तेजप्रताप यादवची लालूंनी पक्षातून तसेच कुटुंबातून हकालपट्टी केली आहे. मोठ्या मुलाचे वर्तन हे बेजबाबदार आणि कौटुंबिक मूल्यांना धरुन नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादवने अनुष्का यादवसोबत असलेल्या 12 वर्षांच्या संबंधाची जाहीर कबुली दिली होती. काही वेळातच ती पोस्ट डिलिटही केली. पण त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी तेजप्रतापला कुटुंबातून आणि पक्षातून काढून टाकलं. एक्सवर पोस्ट करत लालू प्रसाद यादव यांनी यासंदर्भातील माहिती दिली. मुलगा तेजप्रताप यादवचं वर्तन बेजबाबदार असल्याचा ठपका ठेवत लालू प्रसाद यांनी त्याला सहा वर्षांसाठी बाहेरचा रस्ता दाखवला.
Lalu Prasad Yadav Tweet : काय म्हणाले लालू प्रसाद यादव?
खाजगी जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठीचा आपला सामूहिक संघर्ष कमकुवत होतो. मोठ्या मुलाचे कृत्य, सार्वजनिक वर्तन आणि बेजबाबदार वर्तन आपल्या कौटुंबिक मूल्ये आणि परंपरांनुसार नाही. म्हणून मी त्याला पक्ष आणि कुटुंबापासून दूर ठेवतो. आतापासून त्याची पक्षात आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारची भूमिका राहणार नाही. त्याला पक्षातून 6 वर्षांसाठी काढून टाकण्यात आले आहे.
तो स्वतः त्याच्या वैयक्तिक जीवनातील चांगले-वाईट आणि गुण-दोष पाहण्यास सक्षम आहे. त्याच्याशी ज्यांचे संबंध आहेत त्यांनी स्वतःच्या विवेकबुद्धीने निर्णय घ्यावेत. मी नेहमीच सार्वजनिक जीवनात सन्मानाने जगलो आहे. कुटुंबातील आज्ञाधारक सदस्यांनी सार्वजनिक जीवनात ही कल्पना स्वीकारली आहे आणि तिचे पालन केले आहे.
Tej Pratap Yadav Anushka Yadav Relationship : निवडणुकीच्या तोंडावर लालूंसाठी धक्का
बिहार विधानसभेच्या निवडणुकीला अवघे सहा महिने बाकी आहेत. ही निवडणूक एनडीएसाठी, नितीशकुमारांसाठी आणि राजदच्या लालूप्रसाद यादव यांच्यासाठी अतिमहत्वाची आहे. अशा काळात राजदला एक मोठा हादरा बसला. लालूंच्या थोरल्या मुलाने, तेजप्रतापने आपल्या विवाहबाह्य संबंधांची थेट सोशल मीडियावर फोटो टाकत कबुली दिली.
या प्रकरणावरुन एवढा गदारोळ झाला कारण तेजप्रताप यादवचे सात वर्षांपूर्वी ऐश्वर्यासोबत लग्न झालं आहे. त्याचे 12 वर्षांपासून अनुष्कासोबत संबंध होते तर ऐश्वर्यासोबत लग्न का केलं हा प्रश्न विचारला जात आहे. बिहार भाजपनेही लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली होती. अखेर लालूंनी तेजप्रताप यादवची पक्षातून हकालपट्टी केलीच, सोबत कुटुंबातून बेदखलही केलं.
ही बातमी वाचा: