हनोई : भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना, सीमेवर सुरु असलेल्या तणावावरुन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं आणि महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. व्हिएतनाममधील हनोईमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले की, "भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान चांगली बातमी येणार आहे. अमेरिका यात मध्यस्थाची भूमिका पार पाडत आहे."


डोनाल्ड ट्रम्प सध्या व्हिएतनाममध्ये असून उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनसोबत शिखर वार्ता करत आहेत. दोन्ही नेत्यांमधील ही दुसरी शिखर वार्ता आहे.

ट्रम्प म्हणाले की, "माझ्या मते, भारत-पाकिस्तानच्या संघर्षावर चांगली बातमी येणार आहे. दोन्ही देशांमध्ये मागील काही काळापासून तणाव सुरु आहे. आम्ही हे प्रकरण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत आहे. आम्हाला चांगली बातमी मिळत आहे. दशकांपासून सुरु असलेला तणाव लवकरच संपेल, अशी अपेक्षा आहे."

14 फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अमेरिकेने निषेध केला होता. तसंच पाकिस्तानला दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा सल्ला दिला होता. "भारताने आपले अनेक सैनिक गमावले आहेत, त्यामुळे ते मोठे काहीही करु शकतो," असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते.

यानंतर 12 दिवसांनी भारताने पाकिस्तानी सीमेत घुसून एअर स्ट्राईक केला होता. भारताने जैश-ए-मोहम्मदची अतिरेकी तळं उद्ध्वस्त केली होती. भारताच्या या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये मोठं नुकसान झालं होतं. यानंतर पाकिस्तानच्या वायूसेनेने बुधवारी भारतीय हवाई हद्दीचं उल्लंघन केलं होतं. मात्र भारतीय वायूसेनेने त्वरित कारवाई करत पाकिस्तानी विमानांना पळवून लावलं आणि F16 विमान पाडलं. यादरम्यान भारताच्या MIG 16 विमानाच्या वैमानिकाला पाकिस्तानने ताब्यात घेतलं.

संबंधित बातम्या


पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाच्या वडिलांचं देशवासियांना भावूक पत्र


भारताने पाडलेल्या पाकिस्तानच्या F16 विमानाचे अवशेष सापडले


जिनिव्हा करार : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाला परत आणण्याचा मार्ग


पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय वायूसेनेच्या वैमानिकाचे फोटो, व्हिडिओ शेअर करु नका

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं भारतासमोर लोटांगण, चर्चेच्या माध्यमातून तोडग्याची विनंती


भारतीय वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची माहिती


पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला, बडगाममधील चॉपर पाडलं नसल्याची कुबली


पाकिस्तानी मीडियात खोट्या बातम्यांचा पाऊस, भारतीय विमानांना धक्काही नाही


डरपोक पाकड्यांचा डाव उधळला, जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं


...म्हणून आम्ही पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला केला, सुषमा स्वराज यांनी सांगितली कारणं