नई दिल्ली: जॉनसन अँड जॉनसनच्या सिंगल डोसच्या लसीला भारतात मंजूरी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती ट्वीट करुन दिली आहे.  मांडवीय यांनी   ट्वीट करत म्हटलं आहे की, भारताने आपली लस बास्केट वाढवली आहे.  जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल-डोस कोविड -19 लसीला भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आता भारताकडे 5 EUA लस उपलब्ध आहे. यामुळे आपल्या देशात कोविडविरुद्धच्या लढाईला आणखी बळ मिळेल, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.  






 


अमेरिकेत दिली होती स्थगिती


Johnson & Johnson ची लस घेतल्यानंतर सहा महिलांच्या रक्तामध्ये गाठी तयार झाल्याची तक्रार आल्यानंतर अमेरिकेने या लसीच्या वापराला एप्रिल महिन्यात तात्पुरती स्थगिती आणली होती. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येणार असल्याचं अमेरिकेच्या सेन्टर फॉर डिसीज कन्ट्रोल आणि फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनीस्ट्रेशनच्या संयुक्त निवेदनात सांगण्यात आलं होतं.


अमेरिकेत Johnson & Johnson लसीच्या वापराला तात्पुरती स्थगिती, रक्ताच्या गाठी तयार होत असल्याची तक्रार


Johnson & Johnson ची लस घेतल्यानंत केवळ रक्ताच्या गाठीच तयार होत नाहीत तर सोबत रक्तातील प्लेटलेट्सही कमी होत आहेत अशी तक्रार आली आहे आणि हे खूप धोकादायक आहे असं प्रशासनाने सांगितलं होतं. या घटनेनंतर Johnson & Johnson च्या लसीच्या वापरावर तात्पुरती स्थगिती आणण्यात आली आहे.