UPSC Prelims 2021 Postponed : केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडली आहे. 27 जून रोजी ही परीक्षा होणार होती. पण आता ही परीक्षा 10 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील वेगवेगळ्या परीक्षा लांबणीवर पडत आहेत. त्यामध्ये आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचीही भर पडली आहे. ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार, 27 जून रोजी घेतली जाणार होती. आधीच UPSCच्या नियोजित वेळापत्रकानुसार या परीक्षेला उशीर झाला होता. आता पुन्हा एकदा कोरोनामुळे ही परीक्षा लांबणीवर ढकलण्यात आली आहे. तसेच युपीएससीनं 10 ऑक्टोबर ही नवी तारीख जाहीर केली आहे.
यापूर्वीही देशात कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु, युपीएससीनं परीक्षा पुढे ढकलण्यासोबत नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. या संदर्भात यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आलं आहे. यूपीएससी परीक्षा 2021 आणि भारतीय वन सेवा परीक्षा 2021 साठी 24 मार्चपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते.
देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, गेल्या 24 तासात 4120 मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 3,62,727 नवीन रुग्णसंख्येची भर पडली असून 4,120 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारी देशात 3.48 लाख नवीन रुग्णांची भर पडली होती तर 4,205 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे 1.09 टक्के इतकं झालं आहे तर रुग्ण बरं होण्याचं प्रमाण हे 83 टक्के झालं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :