Petrol-Diesel Today : देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. तीन दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये काहीही बदल झाल्याचं दिसलं नाही. देशातील काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांते निकाल लागून 10 दिवसांचा कालावधी लोटला आहे. 2 मेनंतर या 10 दिवसांत सात वेळा तेलाचे भाव वाढले आहेत. या सात दिवसांत पेट्रोल 1.66 रुपये आणि डिझेल 1.88 रुपये प्रति लीटर महाग झालं आहे. 


देशाची राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलची किंमत 92.05 रुपये आणि डिझेल 82.61 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 98.36 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लीटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 93.84 रुपये आणि डिझेल 87.49 रुपये प्रति लीटर डिझेल आहे. कोलकातामध्ये क्रमशः 92.16 रुपये आणि डिझेल 85.45 रुपये प्रति लीटर आहे. 


महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल शंभरीपार 


गेल्या दोन महिन्यांत देशातील अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरु होत्या. यादरम्यान इंधन दर स्थिर असल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, चार ठिकाणी पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. निवडणुकांनंतर मात्र सात दिवसांतच इंधराचे दर गगनाला भिडल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रातही इंधन दरवाढीचं पर्व सुरुच आहे. परभणीमध्ये सर्वाधिक महाग पेट्रोलच्या दराची नोंद झाली आहे. परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल 100.75 पैसे तसेच डिझेलही 90 रुपये 69 पैसे दराने विक्री केले जात आहे. 


एप्रिलमध्ये तेल विक्रीत 9.4 टक्यांनी घट 


देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. राज्यात लागू करण्यात आलल्या लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये तेलाची विक्री 9.4 टक्क्यांनी घटली आहे. एप्रिलमध्ये तेलाचा खप 9.38 टक्क्यांनी घटला आहे. तर मार्चमध्ये हा खप 1.87 कोटी टन होता. देशात एप्रिल 2020 मध्ये कोरोना संसर्गामुळे राष्ट्रव्यापी ल7कडाऊन लावण्यात आला होता. ज्यामुळे अर्थचक्र ठप्प झालं होतं. यावेळी इंधनाचा खप 2006 नंतर सर्वात खाली गेला होता. एप्रिल 2020 च्या तुलनेत यावेळी इंझनाचा खप 81.5 टक्क्यांनी वाढला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :