Union Public Service Commission Result: यूपीएससी Combined Defence Services, CDS II Exam 2021 या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.  शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी आणि अंतिम निकाल upsc.gov.in वर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आला आहे. संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेत बसलेले विद्यार्थी UPSC च्या अधिकृत साईट upsc.gov.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात. निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत उमेदवारांचे गुण उपलब्ध करून दिले जातील, असं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. 


इंडियन मिलिटरी अकादमी, ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, इंडियन नेव्हल अकादमी आणि इंडियन एअर फोर्स अकादमीमध्ये कमिशन्ड ऑफिसर्सच्या भरतीसाठी युनियन लोकसेवा आयोगाद्वारे संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा घेतली जाते. एकूण 214 निकालांच्या आधारे उमेदवारांची अखेर निवड करण्यात आली आहे. अधिक संबंधित तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत साइटला भेट देऊ शकतात.
 
UPSC CDS 2021 OTA चा अंतिम निकाल असा पाहा


अधिकृत वेबसाइटला भेट द्या - upsc.gov.in
आता फायनल रिझल्ट ऑप्शनवर जा ,
"संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2021 (OTA) समोर PDF लिंकवर क्लिक करा.
यात तुमचे नाव आणि रोल नंबर शोधा.
भविष्यातील संदर्भासाठी PDF डाउनलोड करा.


उमेदवारांनी हे लक्षात घ्यायचं आहे की ही गुणवत्ता यादी तात्पुरती आहे. अधिकृत सूचनेनुसार, मेरिट लिस्ट तयार करताना उमेदवारांच्या वैद्यकीय चाचणीचा निकाल विचारात घेतला गेलेला नाही. सर्व उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती आहे. या उमेदवारांची जन्मतारीख आणि शैक्षणिक पात्रता यांची पडताळणी केली जाणार आहे, असं आयोगानं म्हटलं आहे.
 
26 ऑगस्टपर्यंत गुणपत्रक प्रसिद्ध केले जातील


शिफारस केलेल्या आणि निवडलेल्या उमेदवारांचे गुण निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत म्हणजेच 26 ऑगस्ट 2022 रोजी उपलब्ध करून दिले जातील. एकदा रिलीझ झाल्यानंतर, उमेदवार 26 ऑगस्ट 2022 पासून UPSC CDS II 2021 परीक्षेसाठी त्यांचे गुणपत्रक डाउनलोड करू शकतील.


इंडियन मिलिटरी अकादमी, ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, इंडियन नेव्हल अकादमी आणि इंडियन एअर फोर्स अकादमीमध्ये कमिशन्ड ऑफिसर्सच्या भरतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा घेतली जाते.


इतर महत्वाच्या बातम्या


सातारा : आईला कळालं नाही, पोरगं कलेक्टर झालंय, एवढंच कळालं पोराला मनासारख काहीतरी मिळालंय !


बार्टीचा मोठा निर्णय! UPSC पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI