नवी दिल्ली : युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात यूपीएससीचं 2021 चं वार्षिक कॅलेंडर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यामध्ये सर्व परीक्षांचं शेड्युल यूपीएससीच्या upsc.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही बदल यामध्ये करण्यात आले आहेत, तर काही नवीन गोष्टीही करण्यात आल्या आहेत. याबाबतची सविस्तर माहिती यूपीएससीच्या वेबसाईटवर मिळणार आहे.

यूपीएससीमधील सर्वात महत्त्वाची सिव्हिल सर्विस परीक्षा 27 जून 2021 ला निश्चित करण्यात आली आहे. साधारणत: ही परीक्षा मे महिन्यात किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला होत असते. यावर्षीची पूर्व परीक्षाही मे महिन्यात होणार होती ती लांबणीवर पडली असून ती आता 4 ऑक्टोबरला होणार आहे.

परीक्षेचं नाव नोटिफिकेशनची तारीख अर्ज करण्याची अंतिम मुदत परीक्षेची तारीख
कंबाइंड जियो-साइंटिस्ट प्री परीक्षा 2021 07.10.2020 27.10.2020 21.02.2021
सीडीएस परीक्षा (I) 2021 28.10.2020 17.11.2020 07.02.2021
एनडीए आणि एनए परीक्षा (I) 2021 30.12.2020 19.01.2021 18.04.2021
सिव्हिल सर्विसेस प्री परीक्षा 2021, इंडियन फॉरेस्ट सर्विस प्री परीक्षा 2021 10.02.2021 02.03.2021 27.06.2021
इंजीनियरिंग सर्विसेस प्री परीक्षा 2021 07.04.2021 27.04.2021 18.07.2021
सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्सेस एग्जाम 2021 15.04.2021 05.05.2021 08.08.2021
कंबाइंड मेडिकल सर्विसेस एग्जाम 2021 05.05.2021 25.05.2021 29.08.2021
एनडीए आणि एनए परीक्षा (II) 2021 09.06.2021 29.06.2021 05.09.2021
सिव्हिल सर्विसेस मुख्य परीक्षा 2021 17.09.2021
सीडीएस परीक्षा (II) 2021 04.08.2021 24.08.2021 14.11.2021