वाराणसी: उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात आज सात जिल्ह्यात 40 जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत सर्वांच्या नजरा पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ वाराणसीवर आहेत.


शेवटच्या टप्प्यात जवळजवळ 535 उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. आज तब्बल 1.41 कोटी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
उत्तरप्रदेशमध्ये जवळजवळ 15 वर्षांनी सत्तेत येण्याची आशा भाजपला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि इतर नेतेही जवळपास आठवडाभर वाराणसीत प्रचार करत होते. तर मोदींनीही वाराणसीत तीन दिवस प्रचार केला. तर दुसरीकडे अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनीही एक मोठा रोड शो केला होता.

वाराणसी विधानसभेत आठ सीट आहेत. 2012च्या निवडणुकीत भाजपला इथं तीन सीट जिंकता आल्या होत्या. तर 2012 साली या 40 जागांपैकी 23 जागा सपा मिळाल्या होत्या. बसपला 5 तर भाजपला 4 आणि काँग्रेसला 3 जागा मिळाल्या होत्या. तर इतरांना पाच जागा मिळाल्या होत्या.
दरम्यान, उत्तरप्रदेशसह पाच राज्यातील निवडणुकींचा निकाल 11 मार्चला जाहीर होणार आहे.