लखनौ: राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. खास आपल्या शैलीत लालू प्रसाद म्हणाले की, 'मी निवडणुकांचा डॉक्टर आहे. तर भाजपवाले (मोदी) कम्पाउंडर आहेत.' समाजवादी पक्ष आणि काँग्रेस युतीचा उत्तरप्रदेशमध्ये विजय निश्चित आहे. असंही ते यावेळी म्हणाले. यासोबतच त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांच्यावरही टीका केली.


'मी इथं भाजपला नष्ट करायला आलो आहे.' असंही लालू प्रसाद म्हणाले. लालूप्रसाद यांच्या मते, ते निवडणुकीचे डॉक्टर असून त्यांनी प्रत्येक ठिकाणी 'थर्मामीटर' लावून परिस्थितीचा अंदाज घेतला आहे. दिल्लीत उत्तरप्रदेशबाबत फक्त आडाखे बांधण्याचं काम सुरु आहे. असं मत लालू प्रसाद यादव यांनी व्यक्त केलं.

दुसरीकडे लालू प्रसाद यांनी अमित शाहांवर निशाणा साधला. 'अमित शाहा हे जातीयवाद पसरवत आहेत. पण आता उत्तरप्रदेशच्या जनतेनं त्यांना ओळखलं आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर भाजपबाबत नेमकं चित्रं स्पष्ट होईल.'

संबंधित बातम्या:

मुस्लिम असो वा साधू, दफन नको, सर्वांचं दहन करा : साक्षी महाराज

उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यातील 69 जागांसाठी मतदान