लखनऊ : अवघ्या देशाचं लक्ष प्रामुख्याने लागलं आहे ते उत्तर प्रदेशकडे. देशातलं सर्वात मोठं राज्य असलेल्यानं या राज्यावर प्रत्येक पक्षाला आपली सत्ता प्रस्थापित करायची आहे. मात्र सत्ताधारी समाजवादी पक्षावर भाजपने चांगलीच कुरघोडी केली आहे.

उत्तर प्रदेशवर सत्ता मिळवणं हे मोदींसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्यावर राज्यसभेतली अनेक समीकरणं अवलंबून आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभेत 403 जागा आहेत. या जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा समाजावादी पक्ष आणि राहुल गांधी यांचा काँग्रेस एकत्र लढत आहेत. मात्र भाजपने यूपीमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे.

2017 चं पक्षीय बलाबल ( सकाळी साडेअकरा पर्यंत)

भाजप - 303

सपा - 58

काँग्रेस - 11

बसप - 12

2012 चं पक्षीय बलाबल


एकूण जाग : 403

  • सत्ताधारी – समाजावादी पार्टी 229

  • मुख्यमंत्री अखिलेश यादव



  • बहुजन समाजवादी पार्टी– 80

  • भाजप – 40

  • काँग्रेस- 28

  • राष्ट्रीय लोक दल (अजित सिंह)- 8

  • पीपी – 4

  • कौमी एकता दल – 2

  • तृणमूल काँग्रेस - 1

  • इत्तेहाद ए मिल्लत – 1

  • राष्ट्रवादी काँग्रेस -1

  • अपक्ष – 6

  • राज्यपाल नियुक्त – 1