विरोधकांचं शक्तिप्रदर्शन आणि शपथविधी
भाजपला एकजुटीचा इशारा देण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. त्यामुळेच कुमारस्वामी जेव्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, तेव्हा विरोधी पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. देशभरातील प्रमुख 17 विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण पाठवलं असल्याची माहिती आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे नेते तर असतीलच, शिवाय इतर पक्षांचे नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः ट्वीट करुन ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशातील नेत्यांनाही निमंत्रण
उत्तर प्रदेशातील सर्व विरोधी पक्षातील नेत्यांनाही निमंत्रण पाठवलं जात आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपा अध्यक्ष मायावती यांच्यासोबतच राष्ट्रीय लोकदलचे नेते अजीत सिंह यांना निमंत्रण पाठवल्याचं बोललं जात आहे. शिवाय ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.
2019 च्या निवडणुकीवर नजर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांना पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्याची संधी मिळाली आहे. राहुल गांधी याच संधीचा फायदा घेत विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत बोलताना याबाबत संकेतही दिले होते.
संबंधित बातम्या :