बीकानेर : राजस्थानच्या बीकानेरमध्ये दाखल झालेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांना मोबाईलचं नेटवर्क न मिळाल्याने ते चक्क झाडावर चढले.


अर्जुन मेघवाल एका गावात पोहोचले होते. रुग्णालयात नर्स नाही, अशी तक्रार त्यांच्याकडे करण्यात आली. यासंदर्भात अर्जुनराम मेघवाल यांना अधिकाऱ्याशी बातचीत करायची होती. पण त्याने नेटवर्क मिळालं नाही.



झाडावर चढलात तर मोबाईलचं नेटवर्क येईल आणि कॉल होईल, असं गावकऱ्यांनी अर्जुनराम मेघवाल यांना सांगितलं. पण अर्थ राज्यमंत्री झाडावर चढणार कसे, असा प्रश्न पडला होता. यानंतर मंत्री महोदयांसाठी शिडी मागवण्यात आली. झाडाच्या आधारावर शिडी उभी केली. त्यानतंर मंत्रीसाहेब झाडावर चढले.

झाडावर चढल्यानंतर अर्जुनराम मेघवाल यांना नेटवर्क मिळालं आणि त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना ढोलिया गावात नर्सची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. रुग्णालयात नर्स नसल्याने महिलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. मग अर्जुनराम मेघवाल यांनी झाडावर चढून नर्सची नियुक्ती केली.

पाहा व्हिडीओ