नवी दिल्ली : एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे सहसंस्थापक आणि सीईओ प्रणय रॉय यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. सीबीआयने रविवारी उशिरा प्रणय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापा मारला.


प्रणय रॉय यांच्यावर निधीमध्ये फेरफार आणि बँकेचं नुकसान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयने गुन्हाही दाखल केला आहे.

सीबीआयच्या माहितीनुसार, दिल्ली आणि देहाराडूनमध्ये छापा टाकण्यात आळा आहे. प्रणय रॉय यांच्यावर आयसीआयसीआय बँकेचं 48 कोटी रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणात भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, प्रत्येकाला कायद्याची भीती हवी. मग तो कितीही मोठा व्यक्ती का असेना.

सोमवारी सकाळी आठच्या सुमारास सीबीआयची टीम एनडीटीव्ही न्यूज चॅनलचे प्रमोटर प्रणय रॉय यांच्या ग्रेटर कैलाश-1 इथल्या निवासस्थानावर छापा मारला. सीबीआयचं पथक प्रणय रॉय आणि पत्नी राधिका रॉय यांची बँकेची फसवणूक केल्याप्रखरणी चौकशी करत आहे.

याआधी अंमलबजावणी संचलनालयाने फेमा कायद्याचं उल्लंघन केल्यानंतर एनडीटीव्हीविरोधात 2030 कोटी रुपयांची नोटीस जारी केली होती. ईडीने ही नोटीस प्रणय रॉय, राधिका रॉय आणि वरिष्ठ कार्यकारी केव्हीएल नारायण राव यांच्याविरोधात जारी केली होती.